रिया चक्रवर्तीला स्वरा भास्करचा पाठिंबा म्हणाली…

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. पण तरीही त्याला कोणीही विसरू शकले नाही. सुशांत सिंग राजपूतने १४ जुन रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.

या घटनेमूळे सर्वांनाच धक्का बसला होता. त्याच्या मृत्यूच्या धक्क्यामधून त्याचे चाहते आणि कुटुंब अजून देखील सावरलेले नाहीत. रोज या प्रकरणामध्ये नवीन माहीती समोर येत आहे. आणखी एक माहिती समोर आली आहे.

सुशांतच्या वडिलांनी रिया सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवले आहे. तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामूळे रिया चक्रवर्तीची ईडीकडून तपासणी केली जात आहे.

सुशांतच्या वडिलांनी रियावर आर्थिक फसवणूकीचा आरोप केला आहे. परिणामी सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे रियावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर रियाने माध्यमांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

या याचिकेला आता अभिनेत्री स्वरा भास्करने पाठिंबा दिला आहे. रिया विरोधात अफवा पसरवणाऱ्या माध्यमांवर कोर्टाने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

स्वरा भास्करने ट्विट केले आहे की,’ रियाला एका विचित्र आणि धोकादायक मीडिया ट्रायलचा सामना करावा लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराकडे गांभिर्याने लक्ष द्यावे. तसेच खोट्या बातम्या पसरवणाऱ्या माध्यमांवर कारवाई करावी.’

अशा आशयाचे ट्विट करुन स्वराने रिया चक्रवर्तीच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. स्वराच्या ट्विटवर अनेकांनी आपले मत मांडले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.