Share

Swara Bhaskar : होय, मी चूक केली…; स्वरा भास्करला झालाय फहाद अहमदशी लग्न केल्याचा पश्चाताप! सर्वांसमोर सांगीतल्या एकमेकांच्या चुका

Swara Bhaskar : कलर्स टीव्ही (Colors TV) वर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘पती, पत्नी और पंगा’ या नव्या रियालिटी शोमध्ये अभिनेत्री स्वरा भासकर (Swara Bhaskar) आणि तिचा नवरा फहाद अहमद (Fahad Ahmad) हे सहभागी झाले आहेत. यामधून दोघांचं वैयक्तिक नातं, त्यातील कुरबुरी, मतभेद आणि हशा-मजेसह अनेक पैलू समोर येत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या प्रोमोमध्ये स्वरा एक संवाद म्हणते “मी चूक केली”, आणि लगेचच तिचा नवरा फहाद त्याच्या शैलीत स्वरावर मिश्कील टीका करतो. तो म्हणतो की, “या बाईचं ढोलावर फार प्रेम आहे. आमचं लग्न सरकारी कार्यालयात होत असताना तिनं तिथंच ढोल वाजवला, ज्यामुळे त्या अधिकाऱ्याची बदली झाली.” यावर स्वरा भडकते आणि म्हणते, “हा भांडायला आलाय का? आता वाटतंय इथे येऊन चूक केली.”

हा शो लोकप्रिय विनोदवीर मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) होस्ट करत आहेत. शोमध्ये इतरही अनेक लोकप्रिय जोड्या दिसणार आहेत. अभिनेत्री हिना खान (Hina Khan) तिच्या पती रॉकी जयसवाल (Rocky Jaiswal) सोबत, तर अविका गौर (Avika Gor) आणि मिलिंद चांदवानी (Milind Chandwani), तसेच गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) आणि देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) हे ही जोडपे देखील या शोमध्ये सहभागी झाले आहेत.

प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आलेली आणखी एक जोडी म्हणजे रुबिना दिलैक (Rubina Dilaik) आणि अभिनव शुक्ला (Abhinav Shukla). दोघांचं प्रेम, नोंक-झोंक, आणि जुना संवाद यावर आधारित प्रोमोही चाहत्यांना खूप भावतो आहे. अभिनवला विचारले गेलेला प्रश्न “लग्नाआधी किती पर्याय होते?” यावर रुबिनाचं सडेतोड उत्तर प्रेक्षकांना हसवतो.

‘पती पत्नी और पंगा’ हा शो विवाहानंतरच्या नात्यांमधल्या खऱ्या आणि उघडपणे न मांडलेल्या गोष्टी दाखवणार असून मनोरंजनासोबत भावनिक बाजूही अधोरेखित करणार आहे.

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now