स्वप्नाली पाटीलने आस्तादसाठी घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

मुंबई | नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच मराठी सिनेसृष्टीमध्ये लगीनसराई सुरु झाली आहे. अनेक अभिनेत्यांची लगीनघाई सुरु आहे. मानसी नाईक, मिताली मयेकर, सई लोकूर असे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. आत्ता या यादीत अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटीलच्या नावाचा समावेश झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले कपल अभिनेत्री स्वप्नाली पाटील आणि आस्ताद काळे लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.व्हॅलेन्टाइन डेच्या मुहूर्तावर रजिस्टर पद्धतीनं या दोघांनी लग्न केले आहे.

दरम्यान, स्वप्नालीने लग्नात घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ‘बागेत बाग राणीची बाग, आस्तादचा राग म्हणजे धगधगती आग’ असा हटके उखाणा स्वप्नालीने घेतला. तिचा उखाणा ऐकून तेथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांना हसू अनावर होते.

सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेता आस्ताद काळे यांचे मेहंदीपासून ते लग्नापर्यंतच सगळेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहतेही दोघांच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सध्या या लग्न सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
तोंड आल्यामुळे त्रस्त आहात का? ‘हे’ उपाय करुन पाहा
महाराष्ट्राच्या इतिहासातील रणरागिणी ‘छत्रपती ताराराणी’ साकारणार सोनाली कुलकर्णी; पहा फस्ट लुक
अमित शहा नेपाळ व श्रीलंकेतही भाजपचे सरकार आणणार आहेत; भाजप मुख्यमंत्र्याची मुक्ताफळे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.