४५ मधल्या २५ दिवस व्हेंटिलेटरवर असताना महिलेने केली कोरोनावर मात; डॉक्टरही झाले आश्चर्यचकित

राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते, पण आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. पण तरीही हजारोंच्या संख्येने आजही राज्यात रुग्ण भेटत आहे. कोरोनाच्या काळात अनेक आश्चर्याचा धक्का देणाऱ्या घटनाही घडताना दिसत आहे.

अशीच एक घटना नागपुरमध्ये घडली आहे. एका ३५ वर्षीय महिलेने ४५ दिवस कोरोनाशी लढत त्याच्यावर मात केली आहे. या ४५ दिवसांमध्ये ती महिला तब्बल २५ दिवस व्हेंटिलेटरवर होती. तरीही त्या महिलेने कोरोनावर मात केली आहे.

नागपुरमध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव स्वप्ना रसिक आहे. स्वप्ना ही एक गृहीणी आहे. स्वप्ना कोरोनावर करु शकणार नाही, असे डॉक्टरांना वाटत होते. पण तिने कोरोनावर मात केल्याने डॉक्टरांनाही या गोष्टीवर लवकर विश्वास बसत नसून त्यांनी पण आश्चर्य व्यक्त केले आहे.

२५ दिवस व्हेंटिलेटरवर राहून जीवंत राहणे हे एखाद्या चमत्कारापेक्षा नाही, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. स्वप्नाला आपल्या मुलीला भेटायचे होते, पण कोरोनामुळे तिला भेटते येत नव्हते. आता कोरोनातुन बरं झाल्यानंतर तिने सर्वात आधी आपल्या ५ वर्षाच्या मुलीची भेट घेतली आहे.

मी माझ्या मुलीच्या बाबतीतच दिवसरात्र विचार करायचे. तिच्यापासून मला या आजारातून बरं होण्याची प्रेरणा मिळाली आणि शेवटी मी कोरोनावर मात करुन पुन्हा घरी परतले, असे स्वप्ना रसिक असे आहे. स्वप्ना जेव्हा पण शुद्धीत यायची ती तिच्या मुलीबद्दल बोलायची.

सप्ना १९ एप्रिलला कोरोना पॉझिटिव्ह आली होती. २४ एप्रिलला प्रकृती खुप गंभीर झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या दोन्ही आतड्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण पसरले होते. ऑक्सिजन लेव्हल पण कमी झाल्याने आणि प्रकृती खराब झाल्याने तिला २५ दिवस व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते, पण तिने कोरोनावर मात करत पुन्हा आपल्या मुलीची भेट घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

अभिनेत्री प्रत्युषाच्या मृत्यूनंतर ५ वर्षांनी विकास गुप्ताने केला मोठा खुलासा; म्हणाला, मी तिच्यासोबत..
पाणी प्यायला गेलेल्या हत्तीमध्ये आणि मगरीमध्ये जुंपली, पहा थरारक भांडणाचा व्हिडिओ
धक्कादायक! टॉपलेस फोटोमुळे ट्रोल झालेल्या पॉर्न स्टारचा संशयास्पद मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.