Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविषयी आता एक नवीन बातमी समोर आली आहे. संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांच्या या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संजय राऊत हे १ ऑगस्टपासून पत्राचाळ घोटाळ्यातील मनी लॉंडरिंग प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये आहेत. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊतांसंबंधी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. संजय राऊत यांनी बेहिशेबी रक्कम चित्रपट आणि मद्य कंपन्यांमध्ये गुंतवली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
संजय राऊत यांनी राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी नावाची कंपनी स्थापन करून त्याद्वारे ‘ठाकरे’ चित्रपटाची निर्मिती केली होती. यावेळी राऊतांनी बेहिशेबी पैसे गुंतवले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एप्रिल २०२१ मध्ये एका मद्य कंपनीशी त्यांचे व्यावसायिक हितसंबंध असल्याची माहिती स्वप्ना पाटकर यांनी दिली आहे.
यासोबतच संजय राऊत यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या नावे बनावट कंपन्या काढून त्यात बेहिशेबी पैसे गुंतवले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच राऊत यांनी बेहिशेबी रक्कम गुंतवण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांच्या नावे जमीन खरेदी केली, असेही पाटकर यांनी सांगितले.
जानेवारी २०१५ मध्ये ‘बाळकडू’ नावाचा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली म्हणून कुठल्याही नफ्याची अपेक्षा न ठेवता हा चित्रपट काढण्यात आला होता. मात्र, या चित्रपटाने जवळपास ६० लाख रुपये नफा मिळवला असल्याची माहिती पाटकर यांनी दिली.
तसेच राऊत यांनी माझ्या बँक खात्यातून ५० लाख रुपये मला चेक देण्यास भाग पडले. संजय राऊत यांचे या चित्रपटासाठी कुठलेही योगदान नसताना माझ्याकडून जबरदस्तीने ५० लाख रुपये घेतले असल्याची माहितीही स्वप्ना पाटकर यांनी ईडीला दिली.
२००८ ते २०१४ या काळात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये स्वप्ना पाटकर यांनी काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पत्राचाळ प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत याने कार्यालयात येऊन संजय राऊत यांना रोख रक्कम सोपवताना पहिले असल्याचेही पाटकर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
Bank : पुणेकरांनो… आजच पैसे काढून घ्या; उद्यापासून पुण्यातील ही बँक बंद होणार
Eknath shinde : ‘तोंडात चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे का?’ एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Uddhav Thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, परवानगी न मिळाल्यास बाळासाहेबांची ‘ही’ आयडीया वापरणार उद्धव ठाकरे
Shreya Bugde : ..तेव्हा उषा नाडकर्णींचा फोन येताच श्रेया बुगडेलाही फुटला होता घाम, म्हणाली, ‘हवं तर मला मार’