कुंपनच शेत खातय! पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन, वाळू उपसा करणाऱ्यांना करत होता मदत..

शिरूर । शिरूर पोलिस स्टेशन येथे नेमणुकीस असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. इब्राहिम गणी शेख असे या पोलिसांचे नाव आहे. त्यांची अशोभनीय वर्तन करून महाराष्ट्र नागरी सेवा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सेवेतून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी नुकतेच आदेश काढला आहे. त्यांनी
शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत कर्तव्यावर असताना हद्दीतील वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांकडून पैशाची वसुली करून अवैध धंद्यास प्रोत्साहन दिले.

शिरूर पोलिस स्टेशन येथे असलेल्या इब्राहिम शेख यांच्यावर निलंबनाची कारवाई पोलिस अधीक्षकांनी केल्याने शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील वसुली बहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत. यामुळे वाळू उपसा करणाऱ्याला वचक बसणार आहे.

शिक्रापूर रांजणगाव शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारी देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे गेल्या आहेत. यामुळे आता अजून कारवाई होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलीस सावधगिरी बाळगत आहेत.

त्यांनी अवैध धंद्याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. पोलिस स्टेशन हद्दीतील
अवैध धंदे करणाऱ्या मालकांशी परस्पर संपर्क केला असल्याचे निष्पन्न झाल्याचे आदेशात म्हटले आहे. यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्या मधील नियमाचे उल्लंघन केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. यामुळे शिस्तभंगविषयक कार्यवाहीच्या अधीन राहून तात्काळ पोलिस सेवेतून निलंबित करण्याचा आदेश पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी काढला.

ताज्या बातम्या

बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना! भरलग्नात नवऱ्याने नाही, तर दुसऱ्या तरुणानेच केले नवरीला किस; पहा व्हिडिओ

आपण कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोणी आलं तर सोडत नाही- देवेंद्र फडणवीस

हृदयद्रावक! भगत सिंह यांची भूमिका साकारताना चिमुरड्याचा गळफास लागून तडफडून मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.