पती धोका देत असल्याच्या संशयातून पत्नीने मध्यरात्री त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून लावला नटबोल्ट

युक्रेनमध्ये एक अतिशय भीतीदायक प्रकरण समोर आले आहे. जेव्हा एका महिलेला तिच्या पतीवर संशय आला, तेव्हा तिने त्याच्या खाजगी पार्टमध्ये लोखंडी नट अडकवला. हे नट काढण्यासाठी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागली. हे प्रकरण त्याच्या जीवावर बेतल असत.

ही संपूर्ण बाब युक्रेनमधील झापारोझ्ये शहरातील आहे. द सन या वेबसाईटच्या अहवालानुसार, महिलेला तिचा पती आपली फसवणूक करत असल्याचा संशय आला. तिला वाटले की तिचा पती इतर स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवत आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ती महिला तिच्या पतीवर खूप चिडली होती. ज्याच्यामुळे त्याने सूड घेण्यासाठी पूर्ण योजना बनवली.

अहवालात म्हटले आहे की, एका रात्री जेव्हा पती झोपला होता, तेव्हा महिलेने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी नट अडकवला. तिने असे केले जेणेकरून तिचा पती इतर कोणत्याही महिलेशी संबंध ठेवू शकणार नाही. या दरम्यान, तिच्या पतीला जाग अली आणि तो वेदनेने ओरडू लागला.

नट बोल्ट काढण्यासाठी, डॉक्टरांच्या टीमने कोब्रा रेस्क्यू टीमला बोलावले. ज्याने एंगल ग्राइंडर वापरून नट बोल्ट कापला. सुरुवातीला नवऱ्याने स्वतः नट काढण्याचा प्रयत्न केला. पण वेदना वाढतच राहिल्या. लवकरच त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी प्रथम साबण पाण्याने नट काढण्याचा प्रयत्न केला. पण यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांना शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उरला नाही.

डॉक्टरांच्या टीमने कोब्रा रेस्क्यू टीमला शस्त्रक्रियेसाठी बोलावले. या टीमने अँगल ग्राइंडरचा वापर करून अत्यंत काळजीपूर्वक नट कापले. या संपूर्ण प्रक्रियेला बराच वेळ लागला. आवश्यक औषधे दिल्यानंतर त्या व्यक्तीला घरी पाठवण्यात आले. अनेक दिवस शस्त्रक्रियेनंतरही त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत होत्या.

वियतनाममध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहे. वियतनाम वृत्तपत्र व्हीएन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, एका महिलेने आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट कात्रीने कापला. ही संपूर्ण घटना पती झोपलेला असताना घडली. तो ४० वर्षाचा होता. जेव्हा पती वेदनेने ओरडू लागला, तेव्हा महिलेने त्याला रुग्णालयात नेले. डॉक्टरानी शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा प्रायव्हेट पार्ट जोडून दिला.

हे ही वाचा-

यूपी सरकारच्या जाहिरातीत कोलकत्ता पुलाचा फोटो; वृत्तपत्राने दिले असे स्पष्टीकरण की तेही ट्रोल होऊ लागले!

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! विराट कोहली कर्णधारपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत..

“कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे महाराष्ट्रात कधीच निघाले नव्हते, शिवाजी महाराज असते तर यांचा कडेलोट केला असता”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.