कोरोनाने आई देवाघरी गेली, दु:ख सहन न झाल्याने लेकीने मारली थेट इमारतीवरून उडी; पाहा व्हिडिओ

मध्य प्रदेश |  देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. लस, ऑक्सिजन, बेड यांचा मोठा तुटवडा देशात जाणवू लागला आहे. त्यामूळे कोरोना रुग्णांना प्राण गमावावे लागत आहे. रुग्णांचा उपचाराअभावी धक्कादायक तऱ्हेने मृत्यू होत असल्याचं चित्र समोर येत आहे.

देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आणि कोरोनाने अनेकांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कोरोनाने कुणाच्या कुटूंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला. तर कुणाच्या मुलाचा मृत्यू झाला. तर कुणी आपल्या जन्मदात्या आईवडिलांना गमावले आहे.

मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील हिमांशु मेघा सिटी कॉलनीत रितीका नावाची तरूणी आपल्या परिवारासह राहते. काही दिवसांपुर्वी रितीकाच्या आईला कोरोनाची लागण झाली होती.

कोरोनावर उपचार सुरू असतानाच रितीकाच्या आईचा मृत्यू झाला. आईवर जीवापाड प्रेम करणाऱ्या रितीकाला याचा जबर मानसिक धक्का बसला. रितीका नेहमी आईच्या आठवणीत असायची. त्यानंतर रितीकाने धक्कादायक पाऊल उचललं.

रितीकाने राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. यावेळी रितीका बालकणीतून उडी मारत असल्याचं पाहून घरातील लोकांनी बालकणीकडे धाव घेतली. रितीकाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

मात्र वाचवणाऱ्या व्यक्तीच्या हातातून रितीकाचा हात सुटला आणि ती थेट जमीनीवर कोसळली. यातच रितीकाचा मृत्यू झाला आहे. घरातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने रितीकाच्या नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान नेहमीप्रमाणेच एखादी घटना घडत असताना लोक मदत करायची सोडून व्हिडिओ शुट करत बसतात. त्याचप्रमाणे  रितीका आत्महत्या करत असतानाही लोकांनी रितीकाला वाचवायचं सोडून मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत बसले.
महत्वाच्या बातम्या-
बाॅलीवूड अभिनेता अवघ्या चारच दिवसांत झाला कोरोनामुक्त! त्यामागील कारणही सांगीतले
बॉलीवूडमधील लोकप्रिय नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन
भाजप आमदाराची जीभ घसरली, म्हणाले ‘अदर पुनावाला डाकू, त्यांची कंपनी ताब्यात घ्या’
पारदर्शक कपडे घालून फोटोशुट करणे अभिनेत्रीला पडले महागात; लोकं म्हणाले थोडी तरी लाज ठेव; पहा फोटो..

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.