‘माझ्या आत्म.हत्येस ठाकरे सरकार जबाबदार’ अशी चिठ्ठी लिहून एसटी कर्मचाऱ्याची आत्मह.त्या

एसटी मंडळाचा कमी पगार, अनियमतता तसेच सरकारचा कारभार याला कंटाळून एसटी मंडळात वाहक पदावर काम करत असलेल्या मनोज चौधरी यांनी आत्मह.त्या केली आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार आहे. असे सुसा.ईड नोटमध्ये लिहले आहे.

मनोज चौधरी यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईट नोट लिहून ठेवली आहे. ‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्म.हत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना)

तसेच माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करा. असे मनोज चौधरी यांनी सुसा.ईट नोट मध्ये लिहून ठेवले आहे.

जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी असलेले मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्म.हत्या केली आहे. सोमवारी सकाळी साडे आठ वाजले तरी वरच्या मजल्यावरुन खाली आला नाही म्हणून भाऊ त्याला उठवायला गेला असता त्याने हॉलमध्ये गळफास घेतल्याचे दिसले.

शेजारीच त्याने एका वहीच्या पानावर सात आठ ओळींची चिठ्ठी आढळून आली. भाऊ व मित्रांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले, मात्र तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. मनोज हा चार वर्षापासून एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होता. सुरुवातील मुक्ताईगर येथे ड्युटी होती. त्यानंतर जळगाव आगारात बदली झाली.

मनोजची ड्युटी सतत लांब पल्ल्याच्या गाड्यांवर लावली जात होती. तो अनेकांची ड्युटी विभागून घेत होता, मात्र त्याची वेळ यायची तेव्हा त्याला कोणीच मदत करीत नव्हते. त्यात तीन महिन्यापासून पगार नाही. आणि झाला तर वेळेवर होत नाही.

एसटी मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याचे पाहायला मिळत आहे.

गोस्वामींच्या अटकेनंतर विरोधकांनी उठवली टीकेची झोड; राऊतांनी दिले सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले…

अर्नब अटक! राम कदम आक्रमक म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकारला लाज वाटली पाहिजे’ 

सनी देओलचे करिअर खराब करायच्या चक्करमध्ये महेश भट्टने स्वतः च्या मुलीचे करिअर खराब केले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.