Sushma Andhare : पावसाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अचानक दिल्लीला भेट दिली. त्यांच्या या दौऱ्याचे कारण गुप्त ठेवले गेले असले तरी, या भेटीमागे आयकर विभागाच्या (Income Tax Department) नोटीशीचा संदर्भ असू शकतो, असा संशय ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी व्यक्त केला आहे.
सुषमा अंधारे यांची खोचक प्रतिक्रिया
ट्विटरवर एक टीका करताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, “सरडा धोका बघून रंग बदलतो, माणूस मोका बघून रंग बदलतो… पण गुरुपौर्णिमेचा मोका काहीही असला, आयकर विभागाचा धोका त्याहून मोठा आहे… दिघे साहेब बघताय ना?” अशा शब्दांत त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना निशाण्यावर घेतलं.
संजय शिरसाट यांची कबुली
दरम्यान, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आयकर विभागाकडून नोटीस आल्याची कबुली देत खळबळ उडवून दिली. संभाजीनगर (Sambhajinagar) येथील एका कार्यक्रमात बोलताना शिरसाट म्हणाले, “ब्लॅकचे पैसे आता चालणार नाहीत.” पण लगेच त्यांनी यावर स्पष्टीकरण देत, “हे वक्तव्य फक्त माझ्यासाठी होतं,” असं सांगत यु-टर्न घेतला.
त्यांनी सांगितलं की, आयकर विभागाने त्यांना ९ जुलै रोजी खुलासा सादर करण्यास सांगितलं आहे. विभागाला 2019 आणि 2024 मधील त्यांच्या संपत्तीतील वाढीबाबत प्रश्न पडले आहेत.
संपत्तीमध्ये जबरदस्त वाढ
2019 च्या निवडणुकीत संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 3 कोटी 31 लाख रुपये होती. मात्र 2024 मध्ये ती थेट 33 कोटी 3 लाखांवर पोहोचली आहे, म्हणजेच तब्बल 32 कोटी 72 लाख रुपयांची वाढ झाली आहे.
एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामागे आयकर नोटीशीचा संदर्भ?
शिरसाट यांचा उल्लेख करताना त्यांनी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनाही नोटीस गेल्याचं सांगितलं होतं, पण नंतर ते नाव चुकून घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामागे काही आर्थिक विषयांचा संबंध आहे का? हा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.