Sushma Andhare : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. त्यामुळे नव्याने राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या नवीन फेऱ्या सुरु झाल्या. दोन्ही गट आपली बाजू माध्यमांपुढे मांडत आहेत. ठाकरे गटाकडून सध्या सुषमा अंधारे बाजू मांडत आहेत. दसरा मेळाव्यातील त्यांचे भाषण चांगलेच गाजले होते.
त्या सध्या महाराष्ट्रभर महाप्रबोधन यात्रेतही आपल्या भाषणातून शिंदे गटावर आणि त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या भाजपवर जोरदार टीका करत आहेत. त्यांच्या या भाषणाचे व्हीडिवो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांची भाषण पसंत केली जात आहेत.
आता सुषमा अंधारेंची एक कॉल रेकॉर्डींग व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डींगमध्ये त्या शिंदे गटातील आमदार आणि मंत्री असलेले संदीपान भुमरे यांच्याशी बोलत आहेत. यामध्ये त्या शिंदे गटावर आणि भाजपावर टीका करत आहेत.
या कॉलमध्ये संदीपान भुमरे आम्हीच खरे बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार असून आम्हालाच धनुष्यबाण चिन्ह भविष्यात मिळणार, असे विधान करतात. त्याला उत्तर देतांना सुषमा अंधारे म्हणतात की, हो तुम्हालाच मिळणार कारण तुमच्याकडे भाजपा आहे, मोदी आहेत, देशातील तपास यंत्रणाही तुमच्याकडेच आहेत. तुम्ही एकदा बाळासाहेबांचे नाव बाजूला करून तुमचे राजकीय अस्तित्व टिकवून दाखवा.
याला उत्तर देतांना संदीपान भुमरे म्हणाले, आम्ही भाजपासोबत युती करून निवडून आलो होतोत. त्यामुळे आम्ही भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचे फोटो लावणारच. आमचे मूळ बाळासाहेब ठाकरेच आहेत. त्यांच्यामुळेच आम्ही आज मंत्री झालो आहेत.
ते पुढे बोलतांना म्हणाले, आज आम्ही जे काही आहोत ते बाळासाहेबांमुळेच आहोत. देशातील तपास यंत्रणा आपले काम कायद्याच्या चौकटीत राहून करत आहेत. आम्हाला कोणाच्या ही मदतीची गरज नाही.
महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut : चिन्ह गोठवल्याचा फायदा आम्हालाच होणार; संजय राऊतांनी थेट जेलमधून सांगीतला ‘हा’ ॲंगल
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचं ‘मशाल’ चिन्हांसोबतचं ‘हे’ भावनिक पत्रक होतयं व्हायरल; काय आहे नेमकं प्रकरण वाचा
Shahajibapu patil : आधी म्हणले पवारांनी शिवसेना संपवली, आता म्हणतायत, पवार माझं दैवत; शहाजीबापूंचं चाललंय काय?