योगगुरु रामदेव बाबा त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी महिलांवर एक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, माझ्यामते महिलांनी साडी घातली तरी त्या छान दिसतात आणि काही नाही घातलं तरी त्या छानच दिसतात. त्यांच्या या वक्तव्यामुळे खुप वाद झाला होता.
रामदेव बाबांच्या या वक्तव्यावरुन अनेक राजकारण्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता पुन्हा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्या वक्तव्यावरुन रामदेव बाबांवर टीका करत अमृता फडणवीसांवर निशाणा साधला आहे. रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे.
महिलांनी कपडे घातले नाही, तर त्या सुंदर दिसतात, असे वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलं होतं. त्यावेळी तिथे तर उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या तरी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर कोणीही आक्षेप घेतला नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
रामदेव बाबा यांनी महिलांच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे वक्तव्य केले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर कोणीही आक्षेप घेतला नाही अमृता फडणवीस असो वा राज्यातील एकाही व्यक्तीने त्याबद्दल काही बोलले नाही, यावरुनच राजकारण समजून येतं, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
तिथे लगेचच रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता. कारण भारतीय संविधानातील कलम ३५४ नुसार विनयभंगाची संज्ञा अशी सांगते की, एखादं वाक्य किंवा कृतीमुळे महिलांना लज्जा किंवा संकोच उत्पन्न होतो. तिथे विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
तसेच रामदेव बाबा म्हणाले की महिलांनी कपडे नाही घातले तरी चालतं. हे विधान आमच्या मनात संकोच निर्माण करणारे आहे. रामदेव बाबा जेव्हा बोलले तेव्हा त्यांच्या बाजूला अमृता फडणवीस होत्या. त्यांनीही यावर आक्षेप घेतला नाही, असे म्हणत अंधारेंनी अमृता फडणवीसांवरही निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
द्विशतक ठोकायचं मनातच नव्हतं, पण ‘या’ क्षणी बदलला निर्णय; शुभमन गिलने सांगीतले गुपित
मॅच जिंकताच शार्दुलला मिठी मारायला धावला रोहीत, पांड्याची ब्रेसवेलला शाबासी; भारताचा सेलिब्रेशन व्हिडिओ तुफान व्हायरल
ठाकरेंच्या ‘मिशन ठाणे’ला पहिला सुरूंग, थेट तोंडावरच आपटले; वाचा नेमकं काय घडलं