Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता. त्यांच्या शत्रक्रियेनंतर त्यांनी पहिल्यांदाच हा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह उद्धव ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी केली होती.
यावर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. सभांमध्ये कालपर्यंत लावा रे तो व्हिडिओ म्हणणारा माणूस अचानक बंद करा रे तो व्हिडिओ यापर्यंत कसा काय पोहोचतो? तसेच कालपर्यंत भोंगे उतरवण्याची भाषा करणारे भोंग्याच्या बाबतीत अचानक कसे काय शांत बसले? असा प्रश्न विचारत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा वापर हा केवळ राजकारणासाठी केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याप्रमाणे राज ठाकरे एक एक मुद्दे उकरून काढत आहेत, असा आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, जेव्हा माणसाच्या हातात काहीच न राहता सगळंकाही निसटून जाते. तेव्हा राज ठाकरे बाळासाहेब हा एक शब्द आधार देईल म्हणून बाळासाहेबांचे नाव घेतात. तसेच पक्षीय किंवा युतीच्या राजकारणात विशेषतः निवडणूक आणि तिकीट वाटप किंवा सत्ता वाटपाच्या वाटाघाटी असतात त्या चव्हाट्यावर बसून केल्या जात नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
राज ठाकरे हे बैठकांना उपस्थित नसतानाही त्यांना कसा काय साक्षात्कार झाला की, फडणवीस बोलतात ते खरं आणि स्वतःचा भाऊ बोलतोय ते खोटं. राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत सख्खा भाऊ पक्का वैरी असल्यासारखे वागत आहेत, असे त्या यावेळी म्हणाल्या.
भोंगे लावणारे लोक, हनुमान चालीसा वाचणारे लोक, वेगवेगळे मुद्दे काढून ईडीचा गाजावाजा करणारे लोक हे सगळे आता एकदम शांत झाले आहेत. कुणी कुठे काय बोलायचं याबाबत देवेंद्र फडणवीस सगळ्यांना टाईमिंग देत असतात. त्यानुसार ठराविक वेळेत सर्वजण बोलतात, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
बाळासाहेब प्रत्येकाच्या हृदयात राज्य करत आहेत. बाळासाहेबांचे नाव न घेता कोणतेच राजकारण होत नाही. त्यामुळे सर्वजण स्वत:च्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचे नाव घेत असतात, असेही त्या म्हणाल्या. पुढे त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळी कारणे देत शिवसेना सोडली.
ही नैसर्गिक युती होती म्हणून आम्ही तोडली आणि आम्ही हिंदुत्वासाठी गेलो. कारण बाळासाहेबांचा तो विचार होता आणि हिंदुत्वासाठी गेलो, असे त्यांचे म्हणणे आहे. तर मग पहाटेच्या शपथविधीच्या वेळी भाजप कोणासोबत गेली होती, त्यावेळेला भाजपला नैसर्गिक भीती वाटली नाही का? फितूर आहेत आणि सत्तेसाठी वाटेल त्या पद्धतीने राजकारण करतात, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
Udhhav Thackeray : लवकरच स्वत: महाराष्ट्र पिंजून काढणार अन्.., विरोधकांना इशारा देत उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
Uddhav Thackeray : विरोधकांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात, मविआच्या बैठकीत झाला मोठा निर्णय
Bihar : बिहारमध्येही ईडीचे छापेमारीचे सत्र सुरू, फ्लोअर टेस्टच्या आधीच ‘या’ बड्या नेत्यांवर कारवाई
मविआ अजूनही भक्कम! विरोधकांना चारी मुंड्या चित करण्यासाठी ‘असा’ आखला मास्टरप्लॅन