सुशीलकुमार शिंदेंनी चुकून फोडलं नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचे नाव; पुन्हा केली सारवासारव

कॉंग्रेस पक्षाने पक्ष मजबूत करण्यासाठी विविध फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. यातच महाराष्ट्रात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपद कोणाच्या पदरी पडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्याकडून चूकून महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण होणार याचे नाव फोडले गेले आहे.

गेले दोन आठवड्यांपासून कॉंग्रेसमध्ये ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदेंना नविन प्रदेशाध्यक्षाविषयी विचारण्यात आले. तेव्हा सुशीलकुमार शिंदे चुकुन नाना पटोले यांचा उल्लेख आगामी प्रदेशाध्यक्ष असा केला.

पण काँग्रेसकडून याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही, हे लक्षात येताच सुशील कुमार शिंदे यांनी सारवासारव करत नविन प्रदेशाध्यक्ष कोण होणार आपल्याला माहीत नसल्याचे ते म्हणाले. परंतु नकळतपणे त्यांच्या तोंडातून पटोलेंचे नाव आले आहे.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला आहे. पण पटोले यांनी ऐनवेळी अध्यक्षपदासोबतच मंत्रीपद देण्याची मागणी केल्याने पक्षाकडून प्रदेशाध्यक्षाची घोषणा रखडली आहे.

राजपथावर ‘या’ राज्याच्या चित्ररथाने पटकावला पहिला मान; राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे होतयं कौतुक

‘हे’ आहे देशातील असे मुस्लीम गाव जेथील प्रत्येक घरातील मुलगा लष्करात आहे

गरीब परिस्थीतीमुळे कुत्र्याचं मांस पोटच्या मुलांना खायला देत होती ही महिला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.