गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शरद पवार यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद सोपवण्यात यावे, अशी मागणी अनेक नेत्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या(NCP) युवक आघाडीने यासंदर्भातील एक ठराव देखील मांडला आहे.(sushil kumar shinde statement about UPA presidency and shrad pawar)
यादरम्यान काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवारांबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. युपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव जरी चर्चेत असलं तरी अध्यक्षपदासाठी जागाच खाली नाहीये, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला आहे. राजीव गांधी इ-लर्निंग स्कुलच्या कार्यक्रमाला सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, “युपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे. पण युपीएच्या अध्यक्षपदासाठी जागाच खाली नाहीये.” युपीए अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे.
यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील मत मांडले. “जाती धर्माचे राजकारण या देशात चालत नाही. पुन्हा पुन्हा जाती धर्माचे राजकारण चालणार नाही”, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. पत्रकारांशी संवाद साधत असताना सुशीलकुमार शिंदे यांनी सध्या सुरु असलेल्या सूडाच्या राजकारणावर देखील भाष्य केलं.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, “आम्ही जो काळ अनुभवला. त्यावेळी संयम होता. पण परिस्थिती लवकरच सुधारेल”, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी उच्चवर्णीय लोक दंगल घडवतात, असं विधान केलं होत.
यासंदर्भात बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, ” सुजात आंबेडकर यांनी केलेल्या विधानाशी मी सहमत नाही. दंगलीचा आणि जातीचा काही संबंध नाही”, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूरमध्ये आले होते. त्यावेळी शरद पवार यांनी पत्रकरांशी संवाद साधला होता.
यावेळी एका पत्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीए अध्यक्षपदाच्या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी “मला युपीए अध्यक्षपदात काहीच स्वारस्य नाही”, असे उत्तर शरद पवार यांनी दिलं होतं. देशातील महत्वाच्या नेत्यांनी युपीए अध्यक्षपद शरद पवारांकडे सोपवण्याची मागणी केली होती.
महत्वाच्या बातम्या :-
रणबीर कपूरच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या ‘या’ टॉपच्या अभिनेत्र्या, पण प्रेमात मिळाला धोका
चित्रा वाघांनी मला बळजबरीने शिवसेना नेत्याविरोधात जबाब देण्यास भाग पाडले, डांबून ठेवले
सुजात आंबेडकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन मनसे आक्रमक; उपस्थित केला ‘हा’ संतप्त सवाल