….म्हणून सुशील कुमारने हत्येदरम्यान स्वत:चा व्हिडीओ रेकॉर्ड केला, पोलिसांची धक्कादायक माहिती

नवी दिल्ली | भारतीय ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी रविवारी(२३) दिल्लीच्या मुंडका भागातून अटक केली. कुस्तीपटू सागर धनखड हत्या प्रकरणात सुशील कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान आता याप्रकरणी नवा खुलासा झाला आहे. शहरातील कुस्ती क्षेत्रात आपली दहशत पसरवण्यासाठी सुशील कुमारने हत्येचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये ४ मे रोजी कुस्तीपटूंच्या दोन गटांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली होती. या हाणामारीत एकूण पाच जण जखमी झाले होते. त्यापैकी सागर धनखड नावाच्या कुस्तीपटूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

यादरम्यानच “सुशील कुमारने आपला मित्र प्रिन्सला व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सांगितलं होतं. सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पीडितांना जनावराप्रमाणे मारहाण केली. त्याला कुस्ती क्षेत्रात आपली दहशत निर्माण करायची होती.” अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे.

संबंधित मोबाईल व्हिडीओमध्ये सुशील कुमार आपल्या मित्रांसह सागर धनखडला मारहाण करताना दिसत आहे. त्या मोबाईल व्हिडीओला फॉरेन्सिक लॅबने आपल्या अहवालात योग्य ठरवले आहे. हा व्हिडीओ प्रिन्स दलालने बनवला होता. जेव्हा पोलिस छत्रसाल स्टेडिअमध्ये आले तेव्हा सर्व हल्लेखोर पळून गेले होते. मात्र प्रिन्स पोलिसांच्या ताब्यात सापडला होता.

पैलवान सुशील कुमार या हत्याकांडच्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. सुशीलकुमारनं अटकपुर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. ४ मे रोजीच्या मध्यरात्रीपासून सुशील कुमार फरार झाला होता. सुशील कुमार १८ दिवस आपली अटक टाळण्यासाठी ७ राज्यांमध्ये धावपळ करत लपून बसला होता.

कुस्तीपटू सुशील कुमारने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक तर २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.

महत्वाच्या बातम्या-
कोरोनातला देवदूत! आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची जबाबदारी टाटा उचलणार
पैलवान सुशिल कुमारने ‘अशी’ केली सागर धनखडची हत्या; धक्कादायक कारणही आले समोर
आईची माया! ऑक्सिजनवर असलेली ती माऊली करतेय स्वयंपाक; फोटो पाहून तुम्ही कराल कौतूक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.