सुशीलकुमारच्या हातात लाकडी दांडका, जखमी सागर धनगड हात जोडून जीवाची भिक मागत होता; पहा मर्डरच्या दिवसाचा व्हिडीओ

सध्या देशभरात सागर धनकड हत्या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणी सुशील कुमारला अटक करण्यात आली असून त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. तसेच त्याच्यासोबत आणखी ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

आता ज्या दिवशी सागर धनकडची हत्या झाली होती. त्या दिवशीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये सुशील कुमारच्य हातात हॉकी स्टिक दिसून येत आहे.

तसेच सुशील कुमार आपल्या मित्राला व्हिडिओ शुट करण्यासाठी सांगत आहे. तिथे खाली २३ वर्षीय सागर धनकड पडलेला दिसून येत आहे. तो सुशील कुमारची माफी मागत सोडण्याची विनंती करताना दिसून येत आहे. आता या व्हिडिओमुळे सुशील कुमारच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

सुशील कुमारने ज्या ज्या लोकांची नावे घेतली होती. त्यामध्ये चंदीगड आणि हरियाणातील साथीदारांचा समावेश होता. ४ मे रोजी दिल्लीतील छत्रसाल स्टेडिअमवर झालेल्या वादाचा हा व्हिडिओ सध्या खुप व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये सुशील कुमार हॉकी स्टिक असून तो सागरला जबरदस्त मारहाण करत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुशील कुमारने यावर कुठलिही प्रतिक्रिया अजून दिलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सागर खुप जखमी झालेला आहे, असे असताना सुशील कुमार आणि त्याचे साथी सागरला मारताना दिसून येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे, तर पुढील तपास अजून पोलिस करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

छातीत दुखत असतानाही लक्ष्याची आई हसत होती, वाचा लक्ष्याच्या आयुष्यातला न ऐकलेला किस्सा
डॅशींग पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना भर पत्रकार परीषदेत राग अनावर; वाचा पुर्ण किस्सा
HRCT स्कोर 21 असतानाही बेडही मिळेना; जवानानं आईवर शेतातच केले उपचार, असा दिला लढा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.