सुशील कुमारला फासावर लटकवा, त्याचे सर्व मेडल काढून घ्या; सागर राणाच्या कुटुंबाचा आक्रोश

नवी दिल्ली । भारतीय कुस्तीपटू सुशीलकुमार सध्या चांगलाच वादात सापडला आहे. दिल्लीत कुस्तीपटू सागर राणा याच्या हत्येप्रकरणी सुशील कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने पोलीस कोठडीत त्याची रवानगी केली आहे. आता त्यांच्यापुढे अडचणीत वाढल्या आहेत.

आता मृत्यू झालेल्या सागर राणाच्या कुटुंबाने योग्य तपास व्हावा अशी मागणी केली आहे. तसेच सुशील कुमारला कठोर शिक्षा केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे आता हे प्रकरण चांगलेच तापले आहे. ज्याने माझ्या मुलाची हत्या केली तो गुरु म्हणण्याच्या पात्रतेचा नाही.

त्याने जिंकलेले सर्व मेडल काढून घेतले पाहिजेत. पोलीस योग्य तपास करतील असे आम्हाला वाटते. मात्र सुशीलकुमार आपला राजकीय प्रभाव वापरु शकतो, असे सागर राणाच्या आईने फाशीची मागणी करताना म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांनी विशेष पथकाने सुशील कुमार आणि सह-आरोपी अजय यांना अटक केली. ते दोघे गेल्या काही दिवसांपासून फरार होते. त्यांना पकडून देणाऱ्यांसाठी पोलिसांनी सुशील कुमारवर एक लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते.

आता दिल्ली क्राइम ब्रांच याप्रकरणी पुढील तपास करणार आहे. सागर राणाचे वडील हे पोलीस कॉन्स्टेबल आहेत. त्यांनी सुशील कुमारच्या गुन्हेगारी संबंधांचाही तपास करण्याची मागणी केली आहे. फरार झाल्यानंतर तो कुठे होता? त्याला आसरा कोणी दिला? याबाबत देखील तपास करावा असेही त्यांनी म्हटले आहे.

सुशीलकुमारचे कोणत्या गँगस्टरसोबत त्याचे संबंध आहेत. त्याला फासावर लटकवलं पाहिजे म्हणजे लोकांना धडा मिळाले आणि आपल्याच विद्यार्थ्याची हत्या करण्याआधी विचार करतील, असे अरुण यांनी म्हटले आहे. यामुळे आता पुढे कोणत्या गोष्टी समोर येणार हे लवकरच समजेल.

ताज्या बातम्या

एलआयसी पॉलिसी धारकांसाठी धोक्याची घंटा; एका कॉलवर गायब होईल आयुष्यभराची कमाई

बँक ऑफ बडोदाचे १ जूनपासून ‘हा’ नियम बदलणार; ग्राहकांच्या डोक्याला वाढणार ताप

महाराष्ट्र राज्यात होतोय कोरोना कमी; घ्या आजची स्थिती जाणून

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.