पैलवान सुशिल कुमारने ‘अशी’ केली सागर धनखडची हत्या; धक्कादायक कारणही आले समोर

मुंबई | भारतीय ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशिल कुमारला दिल्ली पोलिसांनी रविवारी(२३) दिल्लीच्या मुंडका भागातून अटक केली. कुस्तीपटू सागर धनखड हत्या प्रकरणात सुशील कुमारला पोलिसांनी अटक केली. मात्र सुशील कुमारने सागर धनखडची हत्या का केली? आणि तो गेल्या १९ दिवसांपासून अटक टाळण्यासाठी पोलिसांना चकवा देत फरार का झाला? असे प्रश्न क्रिडाप्रेमीं विचारत आहेत.

पैलवान सुशील कुमार या हत्याकांडच्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. सुशिलकुमारनं अटकपुर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. आता हे नेमक प्रकरण काय आहे आणि सागरच्या हत्येचं कारण याबाबत आता खुलासा झाला आहे.

हत्याकांडाच कारण काय?
सागर धनखड ज्या फ्लॅटमध्ये राहत होता, तो फ्लॅट सुशिल कुमारच्या पत्नीच्या नावावर आहे. ब्रोकरच्या माध्यमातून सागरने हा फ्लॅट भाड्याने राहण्यासाठी घेतला होता. मीडिया रिपोर्टनुसार फ्लॅटच्या भाड्यावरून ही हत्या करण्यात आली आहे.

सागर धनखड हा ज्युनिअर नॅशनल पैलवान होता. त्या फ्लॅटमध्ये सागरशिवाय इतरही सहकारी राहत होते. दरम्यान, सुशिलला कळले की, त्याच्या फ्लॅटवर फरार असणारा कुख्यात गुंड काला झटेडी आणि त्याची गँग लपण्यासाठी येत असते. सुशिल कुमारने ब्रोकरच्या माध्यमातून सागर धनखडला फ्लॅट रिकामा करण्यासाठी सांगितले.

सुरवातीला सागरने फ्लॅट सोडण्यासाठी टाळाटाळ केली. परंतु नंतर त्याने फ्लॅट रिकामा केला. पण एक महिन्याचे भाडे न देताच त्याने फ्लॅट रिकामा केला. सुशिलने ब्रोकरच्या माध्यमातून दोन महिन्यांचे भाडे मागितले. पण तो टाळाटाळ करत होता. अखेर सुशिलने आपल्या सहकाऱ्यांची मदत घेऊन सागर आणि त्याच्या ३ मित्रांचे अपहरण केले.

सागर आणि त्याच्या तिन मित्रांना छत्रसाल स्टेडियममध्ये आणण्यात आले. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. मार खाणाऱ्यांमध्ये काला झटेडीच्या गँगमधील एक होता. त्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या मारहाणीत सागरच्या डोक्याला गंभीर मार लागला. शेवटी सागरने उपचारादरम्यान रुग्णालयात प्राण सोडला.

पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापुर्वीच सुशिल कुमार आणि त्याचे सहकारी त्याठिकाणाहून फरार झाले होते. मात्र सुशिलचा एक सहकारी पोलिसांच्या हाती लागला. मीडिया रिपोर्टनुसार सुशिलने काला झटेडीसोबत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काला झटेडीने त्याला धमकी दिली. यानंतर सुशिल कुमार काला झटेडी आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांमध्ये फरार झाला. तो सतत ठिकाण बदलत होता आणि लपण्यासाठी धावपळ करत होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली.

महत्वाच्या बातम्या-
“माझ्या आईचा फोन कुणी घेतला असेल तर परत आणून द्या”, चिमुकलीचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल
आईची माया! ऑक्सिजनवर असलेली ती माऊली करतेय स्वयंपाक; फोटो पाहून तुम्ही कराल कौतूक
४० दिवसानंतर पण उद्धव ठाकरेंची खुर्ची स्थिर; आचार्य भोसलेंची भविष्यवाणी विरली हवेतच

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.