सुशांतचे पैसे तू उधळलेस बहिणीने नाही; रियावर भडकली ‘ही’ अभिनेत्री

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर अनेक मोठ्या कलाकारांवर निशाणा साधण्यात आला आहे. तसेच या घटनेतील मुख्य संवशयीत म्हणून रिया चकर्वर्तीकडे पाहण्यात येत आहे.

सुशांत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या प्रकरणात अनेक नेत्यांनी तसेच बॉलिवूड कलाकारांनी पुढाकार घेत रिया चक्रवर्ती वर निशाणा साधला आहे.

सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या काम्या पंजाबिने देखील सुशांत आत्महत्या प्रकरणावर आपले मत मांडले आहे. या प्रकरणाविषयी बोलताना तिने रिया चक्रवर्ती वर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच अनेक आरोपही केले आहे.

काम्या पांजाबिने ट्विट करत रियाला एक प्रश्न विचारला, तुला नक्की काय साध्य करायचं आहे?. बहीण-भावामध्ये नेहमी भांडण होत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो तुझ्यासोबत राहत होता बहिणीसोबत नाही, असा संतापही तिने यावेळी व्यक्त केला.

पुढे ती असेही म्हणाली की, सुशांतच्या क्रेडिट कार्डचा वापर तू करत होतीस, त्याची बहीण नाही. असा आरोपही काम्याने ट्विटद्वारे केला आहे.

रियाने सुशांतच्या काही वॉट्सअॅप चॅटचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर शेअर केले होते. सुशांत आणि त्याच्या बहिणीमध्ये सतत भांडण होत असल्याचा दावा, तिने या चॅटमार्फत केला होता. तिच्या या कृतीवर काम्याने संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, ईडीने सुशांत सिंहच्या बँक खात्यावरुन झालेल्या मोठ्या आर्थिक व्यवहारा प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर १५ कोटी रुपयांचा बेनामी व्यवहार केल्याचा आरोप केला आहे.

या आरोपानंतर रिया आणि तिच्या कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, सुशांत आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सुशांतचे आर्थिक व्यवहार आणि आरोग्य अशा सर्व मुद्यांवरून तपास सुरू आहे.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या ५६ लोकांमध्ये रियाचा देखील सामवेश आहे. दरम्यान, रियाला पोलीस ठाण्यात अनेकदा बोलावण्यात आले होते. रियाचा जबाब दोन वेळा नोंदवण्यात आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.