सुशांतची ‘ही’ मॅनेजर होती रियाची खास मैत्रीण..धागे जुळायला लागले

मुंबई| सुशांत प्रकरणामध्ये अनेक लोकांची नावे समोर येऊ लागली आहेत. सुशांतच्या कुटुंबियांनी रिया चक्रावरतीसोबतच सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीवर देखील आरोप केला होता. या प्रकरणाच्या ड्रग्स अँगलने आता श्रुती मोदीचीही चौकशी होते आहे.

या चौकशीमध्ये श्रुती मोदी आणि रिया या बालपणीच्या मैत्रीणी असल्याचे समोर आले आहे. आणि रियाने सुशांतवरती दबाव आणून तिला मॅनेजर बनवल्याची माहिती समोर आली आहे.

आज एनसीबीकडून श्रुतीची चौकशी करण्यात आली. यामध्ये श्रुती आणि रिया लहानपणापसून मैत्रीणी असल्याचे तिने सांगितले आहे. रियानेच माझी व सुशांतची भेट घडवून दिली आणि मला मॅनेजर बनवलं असेही तिने सांगितले.

दरम्यान,श्रुतीला शोविक आणि रियाच्या ड्रग्स प्रकाराबाबत सर्व काही माहिती होते. तीही या प्रकरणात पूर्णपणे सहभागी होती. तिच्या पायाचे फ्रॅक्चर झाल्यामुळे तिने नोकरी सोडली होती. नोकरी सोडल्यानंतरही श्रुती रिया आणि ड्रग्स पेडलर्सच्या संपर्कात होती.

एनसीबीकडून श्रुतीचा फोन जप्त करण्यात आला होता. यामध्ये श्रुतीचे आणि ड्रग्स पेडलर्सचे व्हाट्सऍप चॅट सापडले आहे. जोपर्यंत हे प्रकरण कोर्टामध्ये येत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही असे श्रुतीचे वकील अशोक सरावगी यांनी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.