सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ आज होणार रिलीज; ‘इथे’ पहा मोफत

 

सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ आज रिलीज होणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफाॅर्मवर मोफत पाहता येणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. आज सुशांतच्या मृत्यूला एक महिन्याहून जास्त काळ लोटला आहे.

या घटनेला महिनाभराचा कालावधी उलटूनही त्याचे चाहते हे सत्य स्विकारू शकले नाहीत. अनेक ठिकाणी सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दिल बेचारा हा सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा सिनेमा आहे. त्यामुळे सर्वांनाच या सिनेमाबाबत खुप उत्सुकता आहे.

पण देशात कोरोनामुळे सिनेमागृहे बंद आहेत. त्यामूळे हा सिनेमा प्रदर्शित करणे शक्य नाही. पण ओटीटीववर ही फिल्म प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शन मुकेश छाब्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा सिनेमा आज म्हणजे २४ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

सुशांत सिंग राजपूतचा हा शेवटचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिझ्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या सिनेमामध्ये सुशांतला शेवटचे पाहता येणार आहे.

त्यामूळे या चित्रपटाच्या टिमने काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी हॉटस्टारवर कोणतेही सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार नाही.

म्हणजेच, ज्यांनी हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन घेतले नाही. त्यांना देखील हा सिनेमा पाहता येणार आहे. सिनेमामध्ये ‘संजना सांघी’ ही अभिनेत्री दिसणार आहे.

हा सिनेमा सुशांतच्या फॅन्ससाठी खुप खास आहे. तसेच फिल्म इंडस्ट्रीसाठी देखील हा सिनेमा खुप खास आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे. या सिनेमाचा प्रीमियर आज होणार आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या या शेवटच्या चित्रपटाबाबत जशी चाहत्यांना उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे कलाकार देखील या चित्रपटाबाबत उत्सुक आहेत.

सुशांतला श्रद्धांजलीच्या स्वरुपात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.