सुशांतचे अर्धवट राहिलेले स्वप्न होणार पूर्ण; दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केली मोठी घोषणा

मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे पूर्ण बॉलिवूड हादरला आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी सुशांतने सर्वांचा निरोप घेतला आहे. मात्र त्याच्या चाहत्यांसह अनेक कलाकार त्याच्या आठवणीत दुःख व्यक्त करत आहेत.

मात्र, आता प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक शेखर कपूर यांनी सुशांत सिंह राजपूतला ‘पानी’ चित्रपट समर्पित करणार असल्याची घोषणा केली आहे. शेखर कपूर यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितले की, जर तुम्ही देवासह कोणत्या यात्रेत जोडू इच्छिता तर तुम्हाला सर्व पाऊले आस्थेने ठेवावी लागतील. देवाची इच्छा असेल तर ‘पानी’ एकदिवशी नक्की बनेल, आणि मी तो चित्रपट सुशांतला समर्पित करेन.

सुशांतच्या निधनानंतर शेखर कपूर यांनी ट्विटकरून सांगितले की, मला माहीत आहे तू कोणत्या त्रासातून जात होतास. मी गेल्या ६ महिन्यांमध्ये तुझ्यासोबत असायला हवे होते.

दरम्यान, शेखर कपूर हे यशराज बॅनरअंतर्गत ‘पानी’ चित्रपटाची निर्मिती करत होते. ‘पाणी’ चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत सुशांत सिंह राजपूत झळकणार होता.

या चित्रपटादरम्यान त्याने अनेक मोठे प्रोजेक्ट करण्यासाठी नकार दिला होता. सुशांत ‘पानी’ चित्रपटासाठी खूप जास्त कष्ट घेत होता. मात्र काही अंतर्गत वादामुळे हा चित्रपट पुढे होऊच शकला नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.