सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठाणीचे पितळ पडले उघडे; रियाच्या काॅल डिटेलमधून बाहेर आले सत्य

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. पण तरीही त्याला कोणीही विसरू शकले नाही.

सुशांत सिंग राजपूतने १४ जुन रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेमूळे सर्वांनाच धक्का बसला होता. त्याच्या मृत्यूच्या धक्क्यामधून त्याचे चाहते आणि कुटुंब अजून देखील सावरलेले नाहीत.

या सगळ्यातून सुशांत सिंह राजपूतचे कुटुंब अजून सावरलेले नाही. अशातच सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहे. रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत.

आता सुशांतचा रूम मेट सिद्धार्थ पिठाणीबाबत एक चकित करणारा खुलासा समोर आला आहे. यामूळे सिद्धार्थ या केसमध्ये अडकण्याची शक्यता आहे. गेले वर्षभर सिद्धार्थ सुशांत सोबत राहत होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या एका खोट्या मागील सत्य समोर आले आहे. जे अभिनेत्री रिया चक्रवर्तीशी संबंधित आहे. हा खुलासा ऐकून प्रत्येक जण हैराण होत आहे.

काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तो रिया चक्रवर्तीला ओळखत नाही. सुशांतनेच त्याची व रियाची ओळख करून दिली होती. याव्यतिरिक्त तो रिया बाबत काहीच जाणत नाही.

रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्स वरून काहीतरी वेगळेच समोर आले. समोर आलेल्या कॉल डिटेल्स वरून सिद्धार्थ पिठाणीने सांगितलेल्या खोट्या वक्तव्याचे पितळ उघडे पडले आहे.

रिया चक्रवर्तीचे वर्षभरातील कॉल डिटेल्स समोर आले आहेत. यामध्ये गेल्या वर्षभरात तिने कोणा कोणाला कॉल लावला त्यावर ती किती वेळ बोलली याबाबतची माहिती समोर आली. या कॉल डिटेल्सवरून असे लक्षात आले की रियाने सिद्धार्थला वर्षभरात १०१ वेळा कॉल केले.

एवढेच नाही तर रियाने इंस्टाग्राम अकाउंट वर काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्या व्हिडिओमध्ये रियाने सिद्धार्थ पिठाणीला टॅग केले आहे. एवढेच नव्हे तर काही रिपोर्ट नुसार हे व्हिडिओ सिद्धार्थने शूट केल्याचे म्हटले जाते.

रियाने निर्माता दिग्दर्शक महेश भट यांना १८ वेळा फोन केला. तिच्या वडिलांना ११९२ वेळा, तिचा भाऊ म्हणजेच शौविक चक्रवर्ती ला १०६९ वेळा, श्रुती मोदीला ७९१ वेळा रियाने फोन, तर सैमुएल मिरांडा ला २८७ वेळा केल्याचे समोर आले.

या कॉल डिटेल्स मधून चकित करणारी गोष्ट समजली ती म्हणजे गेल्या वर्षभरात रियाने सुशांतला फक्त १३२ वेळाच फोन लावला होता. सिद्धार्थ पिठाणी रियाला ओळखत नसल्याचे खोटे सांगितल्याचे या कॉल डिटेल्स वरून स्पष्ट झाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.