सुशांत आणि अंकीताच्या नात्यावर सुशांतच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पटना | सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिता आणि सुशांतच्या नात्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. पण सुशांतचे आणि अंकीताचे नाते का संपुष्टात आले हे कोणालाही माहीत नाही. पवित्र रिश्ता या मालिकेपासून त्या दोघांनी आपल्या करियरची सुरुवात केली होती.

सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता खूप दुःखात आहे. जरी त्यांचे नाते संपुष्टात आले होते पण त्यांचे वारंवार एकमेकांशी संपर्क होते. याच नात्यावर सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अंकिता बद्दल ते म्हणाले की, अंकिता लोखंडे ही एकमेव मुलगी आहे जिच्याबद्दल मला माहिती आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता मला भेटायला फक्त मुंबईला नाही तर पटनालाही आली होती. पण मी काहीही बोलण्याच्या मनस्तिथीत नव्हते. असे ते म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, मला सुशांतची मैत्रीण म्हणजे अभिनेत्री कृती सेनन सुद्धा भेटायला आली होती. अंतिम संस्कारामध्ये खूप लोक होते तेव्हा कृती माझ्याजवळ अली होती. कृती सुशांतचे कौतुक करत होती आणि म्हणाली सुशांत खूप प्रेमळ मुलगा होता.

मास्कमुळे मी तिला ओळखू शकलो नाही पण नंतर मला कोणीतरी सांगितले की, ती कृती सेनन आहे. सुशांतच्या लग्नाबद्दल ते म्हणाले की, सुशांतला लग्नाबद्दल विचारले असता तो म्हणाला की आता कोरोना आहे लॉकडाऊन संपले की लग्नाबद्दल विचार करणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.