‘सुशांतच्या प्रकरणात एक युवा नेता स्वतःहून सीबीआय चौकशीला जाणार’

 

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा १४ जूनला वांद्रेच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात त्याने आत्महत्या केल्याची म्हटले जात आहे, मात्र त्याने आत्महत्या का केली? हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.

आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एकीकडे सीबीआय मुंबईत दाखल झालेली आहे. तर दुसरीकडे सुशांतच्या प्रकरणावर राज्यात जोरदार राजकारणही सुरू झाले आहे.

आता सुशांतच्या मृत्यू प्रकरणावर भाजप प्रवक्ते सुरेश नाखुआ यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातील एक युवा नेता स्वतः चौकशीसाठी पुढे जाणार आहे, असे नाखुआ यांनी म्हटले आहे. या ट्विटमुळे राज्यातील राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

एका अत्यंत विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळत आहे की, एक तरुण नेता सीबीआयसमोर चौकशीसाठी जाण्याची माहिती मिळतेय. हा एक मोठा पब्लिश रिलेशन म्हणजेच PR स्ट्रॅटेजीचा भाग आहे, असे ट्विट सुरेश नाखुआ यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यात आधीपासूनच सुशांतच्या प्रकरणावर विरोधी पक्षाकडून ठाकरे सरकारवर आरोप केले जात आहे. तसेच मुंबई पोलीस तपास करत असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून पोलिसांवर दबाव टाकला जात होता, असाही आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला होता.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.