रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकचं सीक्रेट चॅट आलं समोर; झाला सर्वात मोठा खुलासा

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय, ईडी आणि एनसीबी मार्फत या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तसेच या प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्ती हिला अंमली पदार्थांच्या सेवनासह इतर आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) ही कारवाई केली.

याचबरोबर या प्रकरणी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना एनसीबीने अटक केली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील महत्त्वाचा धागा हाती लागण्याची चिन्हे दिसतं आहे. याचे कारण असे की, सुशांत आत्महत्या प्रकरणात शोविक आणि ड्रग्स डिलर अनुज केशवानी यांचे एक व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर आले आहे. ड्रग्स डिलिव्हरीबद्दल या चॅटमधून महत्त्वाची माहिती मिळाली असल्याचे समजतं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अनुज केशवानी आणि शोविक या चॅटमध्ये ड्रग्स डिलिव्हरीबद्दल बोलत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या चॅटमध्ये ड्रग्सचे फोटो शेअर केले आहेत.

या हाती आलेल्या माहितीमुळे नक्कीच या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा एनसीबीची टीम कसून तपास करत आहे. वेगवेगळ्या मार्गांनी महत्त्वाची माहिती मिळवत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

फार्महाऊसवरील पार्ट्यांमध्ये सारा अली खानची उपस्थिती; मॅनेजरचा खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.