सुशांत मृत्यूपुर्वी सलग तीन दिवस करत होता ‘ही’ भयानक गोष्ट; नोकराची धक्कादायक माहिती

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा १४ जूनला वांद्रेच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे, मात्र याबाबत आता सीबीआय तपास करत आहेत.

सीबीआय या प्रकरणाचा तपास सुरुवातीपासून करत आहेत. त्यामुळे सुशांतच्या संबंधित प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जाणार आहे. सीबीआयने सर्वात आधी घरकाम करणाऱ्या नीरज सिंहला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

चौकशीदरम्यान सुशांतच्या नोकराने धक्कादायक माहिती समोर आणली आहे. सुशांत व्यसनी असून तो नेहमी अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा दावा त्याने यावेळी केला. मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात नीरजने ही माहिती दिली आहे.

एवढेच नाही तर सुशांतने मृत्युच्या काही दिवस आधी गांजा ओढला होता. त्याने स्वतः सुशांतसाठी गांजाचे रोल बनवून दिले होते. निरजने एका बॉक्समध्ये चरस ठेवले होते, ज्यादिवशी सुशांतचा मृतदेह आढळला त्या दिवशी त्याने चरसचा बॉक्स तपासला होता.

मात्र, तेव्हा त्या बॉक्समध्ये चरस नव्हते, नीरजला तो बॉक्स रिकामा आढळून आला होता. हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नीरजने मुंबई पोलिसांना तीन पानांचा जबाब पत्र दिले आहे.

नीरजने पुढे असेही सांगितले की, सुशांत आठवड्यातून एक-दोन वेळा तरी आपल्या घरात रिया, आयुषसोबत पार्टी करत होता. या पार्ट्यांदरम्यान सुशांत दारू, गांजा आणि सिगारेट ओढायचा. सॅम्युअल जेकब सुशांतसाठी गांजा सिगारेटचा रोल बनवत होता.

सुशांतच्या बेडरूमची चावी नक्की कुठे असायची? पोलिसांनी हा प्रश्न विचारताच निरजने यावर स्पष्टीकरण दिले आहे. मी रोज घराची स्वच्छता करायचो आणि सुशांत सरांचा बेडरूमही दररोज स्वच्छ करायचो.

सुशांत सर अनेकदा कामानिमित्त बाहेर जायचे. मुंबई बाहेर जाण्यापूर्वी ते आधी बेडरुमला कुलूप लावायचे आणि किल्ली स्वयंपाकघरात ठेवत होते.

पण वांद्रे येथील फ्लॅटमध्ये शिफ्ट झाल्यापासून ते कपडे बदलायच्या वेळेस किंवा रिया मॅडम आतमध्ये असल्यास बेडरूम बंद करायचे. इतर कोणत्याही वेळी रुम लॉक केला जात नव्हता. यामुळे त्यांच्या बेडरूमच्या चाव्या कुठे होत्या हे मला माहीत नाही, असे स्पष्टीकरणही त्याने यावेळी दिले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.