सुशांतला भीती होती रिया त्याला दिशाच्या केसमध्ये अडकवेल; कारण रियाला ‘ही’ गोष्ट माहीत होती..

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, प्रत्यक्षदर्शी अशा बऱ्याच लोकांनी अनेक खुलासे केले आहेत. हे प्रकरण सीबीआय हाताळत आहे. NCB ने या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन शोधून काढले आणि अनेक जणांना अटक केली आहे.

अशातच आता सुशांतचा मित्र सिध्दार्थ पिठाणी याने अजून एक धक्कादायक खुलासा केला आहे. सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदर त्याची मॅनेजर दिशा सालीयान हीचा मृत्यू झाला होता. अशातच दिशाच्या मृत्यूची बातमी एकूण सुशांत बेहोश झाला होता अशी माहिती सिद्धार्थ पिठाणीने दिली आहे.

सिध्दार्थ पिठाणीच्या म्हणण्यानुसार दिशाच्या मृत्यूनंतर सुशांतची तब्येत बिघडली होती. सुशांतला त्याच्या जीवाची भीती वाटत होती. सुशांतने सिध्दार्थला त्याची सुरक्षा वाढवण्यास सांगितले होते. सिध्दार्थने दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या आणि दिशाच्या मृत्यूचा एकमेकांशी संबंध आहे.

सुशांत त्या दिवशी त्याचा लॅपटॉप, हार्ड ड्राइव्ह आणि कॅमेरा शोधत होता. यासाठी त्याने रिया चक्रवर्तीलाही फोन लावला होता पण तिने फोन उचलला नाही. सुशांत खूप अस्वस्थ झाला होता. तो रियाला फोन लावत होता पण ती फोन उचलत नव्हती.

रिया ८ जुनलाच तिचं सर्व सामान घेऊन सुशांतच्या घरातून निघून गेली होती. सुशांतला त्यावेळी भीती वाटत होती की, रियाला त्याचे सर्व पासवर्ड माहीत आहेत. यावरून रिया सुशांतला अडकवू नये, अशी माहिती सिध्दार्थ पिठाणीने सीबीआयला दिली आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शन सापडल्यानंतर रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती या दोघांना NCB ने अटक केली आहे. न्यायालयाने रियाला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.