सुशांत व्यसनी असून मृत्यूपूर्वी तीन दिवस गांजा ओढत होता; नोकराचे धक्कादायक खुलासे

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. परंतु, सुशांतने हा टोकाचा निर्णय का घेतला?, सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली. या घटनेतील सत्य शोधण्याचा सीबीआय प्रयत्न करत आहे.

जसे- जसे दिवस पुढे जात आहेत, तसे या केसला नवीन वळण मिळत आहे. सीबीआयने ही केस हाती घेतल्यापासून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान सुशांतच्या केसमध्ये आता सर्वात मोठा ट्विस्ट आला आहे.

सीबीआय या प्रकरणाचा तपास सुरुवातीपासून करत आहेत. त्यामुळे सुशांतकडे घरकाम करणाऱ्या नीरज सिंहची देखील नव्याने चौकशी करण्यात आली आहे.

चौकशीदरम्यान सुशांतच्या नोकराने धक्कादायक माहिती समोर आणली आहे. सुशांत अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा दावा त्याने यावेळी केला. मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात नीरजने ही माहिती दिली आहे.

एवढेच नाही तर सुशांतने मृत्युच्या काही दिवस आधी गांजा ओढला होता. त्याने स्वतः सुशांतसाठी गांजाचे रोल बनवून दिले होते. सुशांतचा मृतदेह आढळला त्या दिवशी त्याने चरस ठेवण्यात येणारा बॉक्स तपासला.

तेव्हा त्या बॉक्समध्ये चरस नव्हते, नीरजला तो बॉक्स रिकामा आढळून आला होता. हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नीरजने मुंबई पोलिसांना तीन पानांचा जबाब पत्र दिले आहे.

सुशांतच्या घरी साफ-सफाई करणे, कुत्र्याला फिरवणे, स्वयंपाक करण्याचे काम निरज करत होता. यासोबतच सुशांतशी संबंधित इतर गोष्टींची काळजीही निरज घेत होता. दरम्यान सुशांत डिसेंबर २०१९ मध्ये जॉगर्स पार्क वांद्रे येथील फ्लॅटमध्ये रहायला गेला होता.

नीरज तिथेही सुशांतची सर्व कामे करत होता. सुशांत आठवड्यातून एक-दोन वेळा तरी आपल्या घरात रिया, आयुषसोबत पार्टी करत होता. या पार्ट्यांदरम्यान सुशांत दारू, गांजा आणि सिगारेट ओढायचा. सॅम्युअल जेकब सुशांतसाठी गांजा सिगारेटचा रोल बनवत होता.

पुढे निरजने असेही सांगितले की, कधीकधी मीही सुशांत सरांना गांजाचे रोल करून देत होतो. मी तीन दिवस सुशांत सरांसाठी रोल बनवले होते. हे रोल घरात जिन्याच्या खालील कपाटात ठेवले होते.

सुशांत सरांच्या मृत्यूनंतर मी तो सिगारेटचा बॉक्स पाहिला. तेव्हा तो बॉक्स रिकामा होता, असेही नीरजने पोलिसांना दिलेल्या जबाबत म्हंटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.