सुशांत सिंग मृत्यूप्रकरण: सीबीआयला शोधावी लागणार ‘या’ पंधरा प्रश्नांची उत्तरे; जाणून घ्या कोणती आहे..

 

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतचा १४ जूनला वांद्रेच्या राहत्या घरी मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानंतर हे आत्महत्येचे प्रकरण असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

मात्र २५ जुलैला सुशांतचे वडील के के सिंग यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला. तेव्हापासून या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.

या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलीस करत होती. मात्र आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. आता या प्रकरणात सीबीआयला पुढील १५ प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहे.

१) सुशांतचा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या?

२) सुशांतने आत्महत्या केली असेल तर त्यामागील खरे कारण काय आहे?

३) जर सुशांतची हत्या करण्यात आली असेल तर त्यामागील कारण काय आहे आणि ही हत्या कोणी केली?

४) सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी रिया चक्रवर्तीचा काय संबंध आहे?

५) सुशांतच्या मृत्यू प्रकरणामध्ये चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींचा काही संबंध होता का?

६) पैश्यांच्या व्यवहारावरुन झालेले मतभेद आणि इतर आर्थिक गोष्टींमुळे सुशांतचा मृत्यू झाला आहे का?

७) पैशाच्या व्यवहारातून हत्या झाली असेल तर ही हत्या कोणी केली आणि यामागील आर्थिक व्यवहार नक्की काय होते?

८) दिशा सालियान आणि सुशांतच्या मृत्यूचा काही संबंध आहे का?

९) सुशांत मृत्यू प्रकरणामध्ये त्याच्या घरात काम करणाऱ्यांचा किंवा त्याच्या इतर स्टाफचाही हात आहे का?

१०) साक्षीदार म्हणून नोंदवण्यात आलेले जबाब खरे आहेत का?

११) सुशांतच्या आजाराबद्दलचे सत्य काय आहे? तो खरोखर नैराश्याचा सामना करत होता का?

१२) सुशांतच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काही माहिती लपवण्यात आली आहे का?

१३) ८ जून रोजी रिया आणि सुशांतदरम्यान नक्की काय घडले?

१४) १३ आणि १४ जून रोजी सुशांतच्या घरी नक्की काय काय घडले?

१५) सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या घरी दोन रुग्णवाहिका का बोलवण्यात आल्या होत्या?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.