यश राज फिल्म्सने सुशांतला दोन चित्रपटांचे दिले होते १ करोड ३० लाख रुपये पण राहीलेले ६० लाख रूपये मात्र…

 

मुंबई | सुशांतच्या आत्महत्येनंतर पूर्ण बॉलीवूडला धक्का बसला आहे. नेमकी त्याने आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण त्याच्या आत्महत्येनंतर धक्कादायक खुलासे होत आहेत.

काही अभिनेत्यांनी आणि सुशांतच्या चाहत्यांनी घराणेशाहीवर कडाडून विरोध केला आहे. काहींनी तर सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

आतापर्यंत पोलिसांनी २७ जणांचे स्टेटमेंट घेतले आहेत. या स्टेटमेंटमधून पोलिसांच्या हाती बरीच माहिती हाती लागली आहे. पण ती पुरेशी नाहीये. याचदरम्यान पोलिसांनी आदित्य चोप्रा यांच्या यशराज फिल्म्सला त्यांचे सुशांत बरोबर झालेले सर्व फिल्म कॉन्ट्रॅक्टस ची माहिती मागवली होती.

जेव्हा पोलिसांनी या कॉन्ट्रक्टस ची पडताळणी केली तेव्हा पोलिसांच्या निदर्शनास अजून एक धक्कादायक गोष्ट आली आहे. यश राज फिल्म्स ने सुशांतबरोबर ३ फिल्म्स करण्याचे ठरवले होते.

पहिला चित्रपट होता ‘शुद्ध देसी रोमान्स’. सुशांतला या चित्रपटासाठी ३० लाख रुपये मिळाले. या चित्रपटात त्याच्याबरोबर परिनिती चोप्रा आणि वाणी कपूरने काम केले आहे.

काँट्रॅक्टनुसार त्याचा पहिला चित्रपट हिट झाला तर त्याला ३० लाख रुपये मिळणार होते आणि दुसऱ्या चित्रपटाला ६० लाख रुपये भेटणार होते. तसेच तिसऱ्या चित्रपटाला त्याला १ करोड रुपये मिळणार होते.

सुशांतचा तिसरा चित्रपट म्हणजे ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्शी’साठी सुशांतला १ करोड रुपये मिळाले. त्यातील दुसरा चित्रपट म्हणजे ‘पाणी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. आदित्य चोप्रा आणि शेखर कपूर यांच्यात चित्रपटाच्या दिग्दर्शनावरून वाद झाले असे कारण सांगण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.