सीबीआय टीमला सुशांतच्या घरात पाऊल टाकताच समोरचे दृश्य पाहून बसला जबर धक्का

मुंबई | सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे (CBI) देण्यात आला. सीबीआयची एक टीम शनिवारी सुशांतच्या मुंबईतील घरी दाखल झाली होती. या टीमसोबत मुंबई पोलीस दलाचे अधिकारीही उपस्थित होते.

मात्र यावेळी सीबीआय टीमने सुशांतच्या घरात पाऊल टाकल्यानंतर अधिकाऱ्यांना धक्का बसला. कारण सुशांतच्या घरातील जवळपास सर्व वस्तू गायब आहेत.

याचप्रमाणे मुंबई पोलिसांच्या परवानगीने घर मालकाने सुशांतचे सर्व सामान काढण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे आता सर्व घर जवळपास रिकामं झालं आहे.

दरम्यान, यावेळी सुशांतने फास घेतलेली हिरव्या रंगाचे कापड नाट्य रुपांतराकरता सीबीआयने आणलं होतं, तर सुशांतच्या उंचीचा वजनाचा पुतळा घेवून नाट्य रुपांतर केलं गेलं.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.