सुशांत ‘या’ अभिनेत्र्यांना घेऊन पवना डॅमवर यायचा; अखेर बोटचालकांनी बिंग फोडले

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणाबाबत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो वेगवेगळ्या मार्गांनी कसून तपास करत आहे.

सुशांत आत्महत्या प्रकरणी पवना डॅमवर झालेल्या पार्ट्यांमधील काही धक्कादायक खुलासे समोर आले आहे. पवना डॅम येथील बोट चालक जगदीश दासने यासंदर्भात माहिती दिली आहे.

पवना डॅम परिसरात सेलिब्रेटींच्या पार्ट्या साध्यासुध्या होत नसून या पार्ट्यांमध्ये दारु आणि ड्रग्जचा बेसुमार वापर होतं असल्याची माहिती बोट चालकाने दिली. याचबरोबर सारा अली खान, रिया चक्रवर्ती आणि श्रद्धा कपूर या देखील येथे फिरायला आल्या होत्या, मात्र त्या एकत्र कधीच आले नाहीत,’ अशी माहिती बोट चालकाने दिली.

दरम्यान, या पार्ट्यांमध्ये सारा अली खान, सिद्धार्थ पीठानी, दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा, रिया चक्रवर्ती, श्रद्धा कपूर या सर्वांचा समावेश होता. ही लोक खूप वेळ टापूवर बसून दारू प्यायची, गांजा ओढायची आणि नशेच्या आहरी जायची,’ अशी महत्त्वाची माहिती बोट चालकाने दिली.

याचप्रमाणे सुशांत आत्महत्या प्रकरणाचा आता सीबीआय, एनसीबी आणि ईडी या तीन एजेंसी तपास करत आहेत. यात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने कारवाई करत सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला व तिचा भाऊ शोविकला अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

सुशांतची ‘ही’ मॅनेजर होती रियाची खास मैत्रीण..धागे जुळायला लागले

आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येने खळबळ; पोलिसांनी तीन जणांना घेतले ताब्यात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.