सुशांतच्या आठवणीत भाची भावूक; ‘मामा तुमचं रक्त माझ्यात वाहतंय, वाया जाऊ देणार नाही’

मुंबई | १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र सुशांत आता आपल्यात नाही यावर अजूनही कोणाचाच विश्वास बसत नाहीये. विशेष म्हणजे त्याच्या परिवारातील लोक अजूनही त्याच्या निधनावर विश्वास ठेवू शकत नाहीयेत.

त्याचबरोबर आपल्या मामाची आठवण काढत भाची कात्यायनी आर्या राजपूतने त्याच्या नावाने एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. ‘गुलशन मामा माझं या जगात सर्वात जास्त तुझ्यावर प्रेम आहे. आधीही आणि आताही तूच माझ्यासाठी सर्वात अनमोल व्यक्ती आहे,’ असं या पोस्टमध्ये कात्यायनीने तिचा गुलशन मामा म्हणजे सुशांतची आठवण काढली आहे.

‘मी नेहमीच विचार करते की, कधी भविष्यात आपण आकाशाकडे बघून सत्याच्या रहस्यावर चर्चा करणार. आयुष्याबाबतच्या तुमच्या गोष्टी मला नेहमीच पटत होत्या आणि मला अधिक चांगलं बनण्यासाठी प्रेरणा देत होत्या.

मी कधीही विचार केला नव्हता की, मला हा दिवस बघावा लागेल, जेव्हा मला तुमचा आवाज कधीच ऐकायला मिळणार नाही,’ अशा भावना भाचीने व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, आपल्या पोस्टमध्ये कात्यायनीने शेवटी लिहिले की, ‘तुमचं रक्त माझ्या नसांमध्ये वाहतं आणि मी ते बेकार जाऊ देणार नाही. गुलशन मामा, मी नेहमी तुझ्यावर प्रेम करत राहीन’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.