कूपर रुग्णालयातील सुशांतची अटॉप्‍सी करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी; खळबळजनक खुलासा

मुंबई | सुशांत सिंग राजपूत प्रकरणात शवविच्छेदन केलेल्या डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे. सीबीआय चौकशीत सुशांतची अटॉप्‍सी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, मुंबई पोलिसांनी त्यांना लवकरच शवविच्छेदन करण्याला सांगितले होते.

शनिवारी सीबीआयची एक टीम कूपर रुग्णालयात पोहोचली, जिथे सुशांतची अ‍ॅटॉप्‍सी करणाऱ्या डॉक्टरांची विचारपूस करण्यात आली. अ‍ॅटॉप्‍सीच्या अहवालात अनेक त्रुटी आढळून आल्या असल्याचे समोर आले आहे.

सुशांत प्रकरणात मुंबई गाठलेली सीबीआयची टीम शनिवारी दुसर्‍या दिवशी चौकशीत व्यस्त आहे. सीबीआयला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल शुक्रवारी दुपारीच मिळाला, त्यानंतर शनिवारी एक टीम कूपर रुग्णालयात पोहोचली.

रुग्णालयात 5 डॉक्टरांकडून चौकशी केली गेली आहे. अ‍ॅटॉप्‍सी अहवालात अनेक प्रकारचे त्रुटी समोर आल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.