सुशांत प्रकरणात आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई, सुशांतच्या जवळच्या ‘या’ व्यक्तीला अटक

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला काही दिवसांनी एक वर्ष पुर्ण होईल. पण अजूनही या प्रकरणात पोलिस तपास करत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणात आता सुशांतचा मित्र आणि त्याचा रूममेट सिद्धार्थ पिठाणीला एनसीबीने अटक केली आहे.

हैदराबादमधून त्याला अटक करण्यात आली असून लवकरच त्याला मुंबईत आणण्यात येणार आहे. षडयंत्र रचल्याच्या आरोपावरून सिद्धार्थला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

अनेक दिवसांपासून या प्रकरणात कोणाला अटक करण्यात आली नव्हती पण आता सिद्धार्थ पिठाणीला अटक झाल्यानंतर पुन्हा हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सिबीआयही तपास करत होती. त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला पोलिसांनी अटक केली होती.

सुशांतला आपल्या भावाची मदत घेऊन ड्रग्स पुरवल्याचा आरोप तिच्यावर झाला होता. या प्रकरणामुळे अनेक मोठ्या कलाकारांना चौकशीला समोरे जावे लागले होते. दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

त्याच्या आत्महत्येमागे काय कारण होते याची माहिती अजूनही मिळालेली नाही. पण नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला होता. सुंशातचे चाहते अजूनही त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाज उठवत आहेत.

सुशांत सिंग राजपूत पवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचला होता. त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. काय पो छे, शुद्ध देसी रोमांस, छिछोरे अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने मुख्य भुमिका साकारली होती. त्याच्या आत्महत्येमुळे पुर्ण सिनेसृष्टीला हादरा बसला होता.

महत्वाच्या बातम्या
माधूरी दिक्षितच्या नावाने प्रसिद्ध आहे भारतातील ‘हे’ ठिकाण कारण…
आमजद खानच्या मुलाने राणी मुखर्जीसोबत बॉलीवूडमध्ये केला होता डेब्यू; पण मिळाले नाही यश
देशातील ६० टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यु कोरोनाने नाही तर ‘या’ कारणामुळे झाला; धक्कादायक माहिती उघड
डॅशींग पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना भर पत्रकार परीषदेत राग अनावर; वाचा पुर्ण किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.