सुशांत सिंह प्रकरण: सीबीआय तपासाच्या निकालानंतर नितेश राणेंनी ‘त्या’ नेत्यावर पुन्हा साधला निशाणा

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.

भाजपा नेते नितेश राणेंनी ट्विट करून निशाणा साधला आहे. ‘अब बेबी पेंग्विन तो गयो!!! इट्स शो टाईम!’ असं नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये जस्टिस फॉर सुशांत सिंह राजपूत हा हॅशटॅगदेखील वापरला आहे.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यावर आरोप झाल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले होते. भाजपच्या कुठल्याही नेत्याने थेट नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर होता.

त्यामुळे नितेश राणे यांनी केलेल्या या  सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात मात्र उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘बिहार सरकारची संपूर्ण प्रक्रिया योग्य होती, हे या निर्णयावरून हे स्पष्ट झाले. आता सुशांत आणि त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल, असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे. सत्यमेव जयते, असं ट्विट पार्थ यांनी केलं आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.