सुशांत केसमध्ये चावीवाल्याने केला खुलासा, त्या रात्री नेमके काय झाले होते !

मुंबई | सुशांत सिंह राजपूतची केस आता सीबीआयकडे आली असून सीबीआयने तपासाला सुरूवात केली आहे. तसेच केससंबंधी लोकांना विचारपूस केली जात आहे. अशातच चावीवाल्याचा जबाब समोर आला आहे.

यामध्ये पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, चावी तयार करणाऱ्याने सांगितले की, मला १४ जूनला १.०५ वाजता सिद्धार्थ पिठानीचा फोन आला होता. मी त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर लॉकचा फोटो पाठवण्यास सांगितले होते. मी सहाव्या मजल्यावर गेलो. मी माझ्या साहित्याने दरवाज्याचं लॉक उघडण्याचा प्रयत्न केला. मग ते म्हणाले की, दरवाजा तोड,’ असं चावी तयार करणाऱ्या व्यक्तीने सांगितले.

पुढे चावीवाल्याने सांगितले की, ‘लॉक कॉम्प्युटराइज्ड होतं. त्याला हातोड्याने तोडावं लागलं. लॉक तोडल्यावर २ हजार रूपये देऊन लगेच जाण्यास सांगण्यात आलं. रूममध्ये जाण्याच मनाई केली होती,’ असा धक्कादायक खुलासा चावी तयार करणाऱ्याने केला.

दरम्यान, मिळालेल्या रिपोर्टनुसार, या चावीवाल्याला १४ जून रोजी जेव्हा दरवाज्याचा लॉक उघडण्यासाठी बोलवण्यात आलं तेव्हा त्याला हे माहीत नव्हतं की, हे सुशांत सिंह राजपूतचं घर आहे. त्याने सांगितले की, सिद्धार्थ पिठानीने त्याला फोन केला होता. दरवाज्याचं लॉक उघडताच त्याला लगेच २ हजार रूपये दिले गेले आणि त्याला लगेच जाण्यासाठी सांगण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.