सुशांत सिंग राजपूतने खुप कमी वेळामध्ये बॉलीवूडमध्ये नाव कमावले आहे. सुशांतला बॉलीवूडचे भविष्य म्हणून बघण्यात येत होते.
पण १४ जुनला सुशांत सिंग राजपूतने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यामूळे सर्वांनाच धक्का बसला होता.
सुशांतला जावून एक महिना झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर सुशांतच्या आयुष्यावर चित्रपट बनविण्याची घोषणा करण्यात आली होती.
सुशांत सिंग राजपूतच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झाला आहे. विजय शेखर गुप्ताने काही दिवसांपूर्वी सुशांतच्या जीवनावर आधारित एक चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला होता.
विजय शेखर गुप्ताने यांनी म्हटले होते की, हा चित्रपट सुशांतने उचललेल्या इतक्या मोठ्या पावलावर आणि त्याच्या समस्यांवर आधारित असेल.
पण आत्ता सुशांतच्या जीवनावर बनवण्यात येणार असलेला ‘सुसाइड और मर्डर’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आला आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासारखा हुबेहूब दिसणारा डुप्लीकेट सचिन तिवारी मुख्य भुमिका साकारणार आहे.
निर्मात्यांनी सचिनची या चित्रपटासाठी निवड केली आहे. पण सुशांतच्या चाहत्यांसाठी हि आनंदाची गोष्ट होऊ शकते.
सुशांतच्या मृत्यूनंतर सचिन तिवारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. पण सचिनला सुशांतच्या भुमिकेमध्ये पाहणे. त्याच्या चाहत्यांना आवडणार नाही.