सुशांत सिंग राजपूतसारखेच ‘या’ दक्षिणात्य अभिनेत्याने नैराश्यातून संपवले होते आयुष्य

सुशांत सिंगच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. पण अजूनही खरे कारण समोर आले नाही.

बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांनी आत्महत्या केली आहे. पण आजही अनेकांचा मृत्यू रहस्य बनून राहीला आहे. फक्त बॉलीवूडचं नाही. तर दक्षिणात्या चित्रपटसृष्टीतही कलाकारांनी नैराश्यातून आत्महत्या केली आहे.

उदय किरण तेलगू चित्रपटांमधील अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले होते. पण २०१४ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी उदय किरणने आत्महत्या केली.

त्याच्या निधनाला सहा वर्ष उलटल्यानंतरही त्याचे चाहते त्याला विसरलेले नाहीत. सुशांत सिंग राजपूत आणि उदय करण यांच्यामध्ये साम्य होते. त्यामूळे सोशल मीडियावर त्याचे पुण्यस्मरण केले जात आहे.

उदय किरणचा जन्म २६ जून १९८० रोजी तेलगु भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला होता. वयाच्या विसाव्या वर्षी त्याने ‘नुवु नेनु’ या चित्रपटापासून टॉलीवूडमध्ये प्रवेश केला.

२००१ मध्ये त्याला चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (तेलगू) ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाला होता. चिरंजीवी हे उदय किरणला खुप सहकार्य करत होते.

उदयकडे चिरंजीवी यांनी त्यांची कन्या सुश्मिताशी लग्न करण्याचा प्रस्ताव आणला होता. २००३ मध्ये अभिनेता उदय किरणचा साखरपुडा अभिनेते चिरंजीवीची मुलगी सुष्मिताशी झाला. परंतु काही कारणाने साखरपुडा मोडला.

हा साखरपुडा मोडल्यामूळे उदय किरण खुप टेन्शनमध्ये होता. त्याच्या करीअरमध्येही या काळात अनेक अडचणी येत होत्या. त्याच्या हातून अनेक मोठे चित्रपट गेले होते.

त्यानंतर उदयने तेलुगुऐवजी तमिळ सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला जास्त यश मिळाले नाही. त्यानंतर जवळपास वर्षभर तो आर्थिक संकटात होता.

या गोष्टींमूळे उदय डिप्रेशनमध्ये होता. त्यानंतर त्याचे एका तरुणीसोबत ब्रेकअप झाले. त्यामुळे तो प्रचंड अस्वस्थ होता. तो तिच्या आठवणीत रडायचा. त्यानंतर २४ ऑक्टोबर २०१२ रोजी त्याने विशिताशी लग्न केले.

पण त्याच्या अडचणी कमी होत नव्हत्या. ५ जानेवारी २०१४ रोजी उदय किरणने आत्महत्या केली. पत्नी कामानिमित्त बाहेर गेली असताना. उदय किरणने गळफास घेऊन आयुष्य संपवले. त्यावेळी उदय किरण नैराश्यात असल्याचे बोलले जाते.

सुशांतच्या आणि उदय किरण यांच्या नैराश्याचे कारण थोडेफार सारखेच असल्याचे म्हटले जात आहे. दोघांनीही आत्महत्या केली.

दोघेही सेल्फमेड स्टार होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट नसले. तरी दोघांनीही डिप्रेशनमधून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.