सुशांतच्या पुण्यतिथी आधी या अभिनेत्याने केले त्याच्या चाहत्यांचे कौतुक, म्हणाला सुशांतने हे कमवलं होतं

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला १४ जूनला एक वर्ष होईल. १४ जून २०२० ला सुशांत त्याच्या मुंबईतील घरी मृत अवस्थेत आढळला होता. तेव्हापासून सुशांतचे चाहते या अभिनेत्याला न्याय मिळावा यासाठी मागणी करत आहेत.

सुशांतचे चाहते सोशल मीडियावर वेळोवेळी त्याच्यासाठी न्यायाची मागणी करत असतात. अशा परिस्थितीत नुकताच ट्रस्टिंग एसबीआय चीफ 4 एसएसआर असा ट्विटर ट्रेंड केला गेला. यावर बिग बॉस फेम अली गोनी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अली गोनी याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ही स्टोरी शेअर करत त्याने लिहिले आहे, “सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूला एक वर्ष पुर्ण झाले आहे. परंतु सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचे नाव ट्रेंड केले नाही असा एकही दिवस नाही. हे कमवलं होतं सुशांतने.”

सुशांतने त्याच्या छोट्या जीवनात चाहत्यांचं प्रेम मिळवले होते. आजही त्याच्यासाठी चाहते भावुक होताना दिसतात. अली गोनीला हेच म्हणायच आहे. त्याची इंन्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुशांतच्या निधनानंतर सुमारे महिनाभराने कुटुंबीयांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यासाठी त्यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला जबाबदार धरले होते.

काही काळानंतर हे प्रकरण सीबीआय आणि एनसीबीपर्यंत पोहोचले. गेल्या वर्षी एनसीबीने केलेल्या चौकशीनंतर रिया आणि तिचा भाऊ शौविक यांना अटक केली होती. त्यांना १ महिन्यासाठी तुरूंगात राहावे लागले होते. आता नुकताच एनसीबीने सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीलाही अटक केली आहे. चाहत्यांचे सुशांतच्या न्यायाकडे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-
रतन टाटा देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपनीत करणार मोठी गुंतवणूक
‘बाहुबली’तलं माहिष्मती साम्राज्य काल्पनिक नाही, याठिकाणी आहे खऱ्या अस्तित्वाची नोंद
‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधील साध्या आणि सोज्वळ लतिकाचे हे फोटो पाहून विश्वास बसनार नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.