रिया-सुशांतच्या भांडणानंतर महेश भटने आणखी तेल टाकत रियाला केला सपोर्ट; चॅट उघड

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरु केलाय. त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचा व्हॉट्सअ‌ॅप चॅट समोर आला आहे. सुशांतंच घर सोडल्यानंतर रियाने महेश भट्ट यांना व्हॉट्सअ‌ॅप मेसेज केला होता. त्यावरुन सुशांत प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

या चॅटिंगमध्ये रियाने मूव्ह ऑन झाल्याचं लिहिलं आहे. जड अंतकरणाने मी पुढे जात आहे, असा रियाने पहिला मेसेज ‘आयशा मूव्ह’ ऑन असा केला आहे. जिलेबी या चित्रपटात रिया चक्रवर्तीच्या भूमिकेचं नाव आयशा आहे. आज तक यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

दुसरीकडे सुशांत प्रकरणाने वेग घेतला आहे. सीबीआयचे अधिकारी आज मुंबईत दाखल झाले आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपविल्यानंतर तपास अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. सीबीआयने यासाठी एका एसआयटीचं गठन केलं आहे.

एसआयटीचं नेतृत्व सीबीआयचे जॉइंट डायरेक्टर मनोज शशीधर करतील. त्यांच्याशिवाय गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद आणि आणि एडिशनल एसपी अनिल यादव या टीमचा भाग असतील. हे सर्व अधिकारी सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करतील.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.