अंकिता लोखंडेची सुशांत सिंह राजपूतसोबतची पहिली भेट होती खूप भयानक; अभिनेत्रीने जुन्या आठवणींना दिला उजाळा…

छोट्या पडद्यावरील आवडत्या जोड्यांमध्ये अनेकांची नवे समोर येतात. प्रेक्षक आपल्या आवडत्या जोडीचे दिवाने असतात. त्यातीलच एक जोडी म्हणजे बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे होय. या दोघांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली.

ही जोडी पहिल्यांदा एकता कपूरच्या प्रसिद्ध टीव्ही सीरियल ‘पवित्र रिश्ता’ मध्ये दिसली होती. या शोमध्ये या जोडीने अर्चना आणि मानवची भूमिका साकारली होती. लवकरच आता या मालिकेचा दुसरा सीझन प्रसारित होणार आहे.

अलीकडेच एका खास मुलाखतीत अंकिताने सुशांत सिंह राजपूतसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले आहे. अंकिता म्हणते, आमची पहिली भेट खूप विचित्र होती, मला वाटते की मी त्याच्यासोबत खूप विचित्र वागले. शाहीर शेख सारखा सुशांत देखील अतिशय शांत स्वभावाचा होता. मला वाटायचे की तो फक्त त्याच्या कामात व्यस्त राहायचा.

आम्हाला पवित्र रिश्ता शोच्या प्रोमो शूटसाठी जायचे होते. मला आठवते की तो माझ्या घरी मला घ्यायला आला होता. माझी आई सुद्धा मला सोडायला आली होती. मला खूप उशीर झाला होता. माझे केस आणि मेकअप माझ्या घरी सकाळी ४ पासून केले जात होते. ५ वाजता सुशांत मला घ्यायला आला.

अंकिताने पुढे सांगितले की, मी माझ्या घरातून ६ वाजता खाली आले तेव्हा सुशांत माझ्यावर खूप चिडला होता. मी घरातून खाली येताच आईसोबत त्याच्या गाडीच्या मागच्या सीटवर बसले, आणि हळूहळू मला झोप लागली. हे पाहिल्यावर त्याला खूप राग आला कारण आधीच मी उशिरा आले  आणि येताच झोपी गेले.

काही वेळानंतर त्याने ड्राईवरकडून कार घेतली आणि वेगाने गाडी चालवायला सुरुवात केली. तो अस का करत आहेत हे मला समजत नव्हते. माझ्या आईने मला त्या वेळी सांगितले की, तो खूप चिडला आहे, पण मी विचार करत होते की, यात माझा काय दोष? त्याने माझ्या घरी वरच्या मजल्यावर यायला हवे होते. सुशांतशी माझी पहिली भेट अशीच काहीशी होती. त्याला वाटले की बाप रे गाडीत बसताच झोपी गेली. हिच्यात पूर्ण हीरोइन सारखी अकड़ आहे.

अंकिता आणि सुशांत ६ वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचे संबंध २०१० ते २०१६ पर्यंत टिकले. त्यानंतर ही जोडी एकमेकांपासून पूर्णपणे विभक्त झाली. ३ वर्षांनंतर, सुशांतने पवित्र रिश्ता शोला अलविदा म्हटले आणि चित्रपटांमध्ये त्याचा प्रवास सुरू केला.

महत्वाच्या बातम्या
“कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे महाराष्ट्रात कधीच निघाले नव्हते, शिवाजी महाराज असते तर यांचा कडेलोट केला असता”
संजीव कपूर यांना सुरूवातील शेफ बनायचे नव्हते, त्यांच्या या एका चुकीमुळे ते आज घराघरात झाले फेमस
गणपतीसाठी’मोदक’ बनवण्याची आगळीवेगळी पद्धत; अशाप्रकारे बनवा लाजवाब मोदक..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.