फार्महाऊसवरील कुत्र्यांसाठी सुशांतने मृत्यूच्या एक दिवस अगोदर पाठवले होते पैसे!  

मुंबई । अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत आहे. अमली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून सुशांत प्रकरणाने एक वेगळच वळण घेतले आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे.

सुशांतच्या मृत्यूसंबंधित सुशांतचे कुटुंबीय, मित्र, प्रत्यक्षदर्शी लोक रोज नवनविन गोष्टींचा खुलासा करत आहेत. अशातच आता सुशांतचा फार्महाऊस मॅनेजर रईस याने अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. सुशांतच्या फार्महाऊसवर त्याने तीन कुत्री पाळली होती.

सुशांतच्या मृत्युच्या एक दिवस अगोदरच सुशांतने फार्महाऊसवरील या कुत्र्यांच्या नावाने निधी पाठवला होता, अशी माहिती सुशांतचा मॅनेजर रईसने दिली. रईसने सुशांत संबंधित इतरही काही महत्वाचे खुलासे केले आहेत.

सुशांत ट्रीपसाठी अनेकवेळा आयर्लंडला जात होता, सुशांत बोटिंगही करत असायचा. मधल्या काळात सुशांत युरोप ट्रीपला गेला होता. मात्र, युरोप ट्रीपवरून आल्यापासून सुशांतची तब्येत ठीक नव्हती. सुशांतला नेमके काय झाले होते हे समजत नव्हते, अशी माहिती रईसने दिली आहे.

एप्रिल 2020 मध्ये रियाचे सुशांतच्या फार्महाऊसवर येण जाण चालू झाले होते. एप्रिल 2020 ला सुशांतच्या फार्म हाऊसमध्ये बर्थडे पार्टी सेलिब्रेट करण्यात आली होती. सुशांतच्या या पार्टीला रियाचे आईवडील देखील आले होते, असेही रईसने म्हटले आहे.

ठोस पुरावे मिळल्या एनसीबीने रियाला अटक केली आहे. तसेच रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत यांच्यासह अनेकांना एनसीबीने याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.

चौकशीमध्ये रियाने अनेकांची नावे सांगितली आहेत. आता त्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. यामध्ये सारा अली खानचे देखील नाव आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.