मृत्यू.च्या सहा दिवस आधी रियाने सुशांतचे घर का सोडले? वकीलांनी सांगितले वेगळेच कारण..

गेले अनेक महिने सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचा तपास चालू आहे. या तपासात अनेक धागे दोरे पोलीसांच्या हाताशी आले आहेत. तर अनेक यायचे आहेत. रोज नवीन खुलासे होत आहेत. आता रिया चक्रवर्तीने सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधी म्हणजेच ८ जूनला सुशांतचे घर का सोडले होते, यावर रियाचे वकील मानशिंदे यांनी खुलासा केला आहे.

रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांच्या म्हणण्यानुसार “डॉक्टरांनी सुशांतला ड्रग्सचे सेवन बंद करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्याने रिया चक्रवर्तीचा आणि डॉक्टरांचा सल्ला न ऐकल्याने अखेर सुशांतच्या इच्छेनुसार तिने ८ जुनला त्याचे घर सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रिस्क्रिप्शनमध्ये बदल करून सुशांतला चुकीची औषधे दिल्याचा आरोप रियाने त्याच्या बहिणी मितू सिंह आणि प्रियांका सिंह यांच्यावर केला आहे.

सुशांतच्या बहिणीनी प्रस्क्रिप्शनमध्ये खाडखोड करून त्याला औषध दिल्याचा आरोप करत रिया चक्रवर्तीने त्याच्या बहिणीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. रियाच्या या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करणे आमचे कर्तव्य असल्याचे म्हणत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे आणि रियाचा एफआयआर दाखल करून घेतला आहे.

त्याचबरोबर सुशांतसिंह हा मानसिक आजारी असून मुंबईत उपचार घेत असल्याचे माहीत असतानादेखील त्याच्या कुटुंबीयांनी त्याला ही औषधे देणे सुरूच ठेवल्याचा आरोप रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केला आहे.

त्याचबरोबर सुशांतला पाच डॉक्टरांनी त्याची मानसिक स्थिती पाहून ड्रग्स घेण्याचे थांबवायला सांगितले होते, असा आरोपदेखील या वेळी सतीश मानेशिंदे यांनी केला. पण सुशांतने याला विरोध केल्याने १४ जूनला सुशांतच्या आत्मह.त्ये अगोदर ८ जूनला रियाने त्याचे घर सोडले होते.

त्या गोष्टीचा सूड राजेश खन्नांनी उगवला; करोडोंच्या संपत्तीतील फुटकी कवडीसुद्धा डिंपलला दिली नाही

अर्णब प्रकरणातील ‘ते’ सत्य जर मी मांडले तर सर्वांना पळता भुई थोडी होईल; राऊत गरजले

अगं बाबोव! बाॅलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने घातलाय तब्बल ३७ करोडचा ड्रेस; कारण वाचा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.