लोणावळ्याच्या फार्महाऊसवर नेमकं काय व्हायचं?; सुशांतच्या मॅनेजरने केला खुलासा

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स संदर्भातील आरोपात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला एनसीबीने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात एनसीबीने १० जणांना ताब्यात घेतले आहे. अद्याप या प्रकरणात कुणालाही जामीन मिळालेली नाही.

मात्र रोज येणाऱ्या नवनवीन खुलाश्यांमुळे या प्रकरणाचा गुंता आणखीनच वाढला आहे. अशातच आता सुशांतच्या लोणावळा येथील फार्महाऊसवर अनेकदा पार्ट्या होत असून त्यात साराची बऱ्याच वेळा उपस्थिती असायची अशी माहिती मिळत आहे.

यामुळे आता या प्रकरणातील काही महत्त्वाचे धागे दोरे सापडणार का? अशी चर्चा आहे. सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाबाबत काही दिवसांपूर्वी सुशांतच्या फार्महाऊसमध्ये स्टींग ऑपरेशन करण्यात आले. यावेळी या फार्माहाऊसचा मॅनेजर रईस याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

मॅनेजर रईसने सांगितले की, ‘सुशांतच्या या फार्महाऊसमध्ये बऱ्याच वेळा पार्ट्या होत असे आणि त्यात अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी व्हायचे. यात सारा अली खानदेखील असायची. सारानंतर रिया चक्रवर्तीदेखील अनेकदा यायची. सुशांतला कधीच ड्रग्स घेताना पाहिले नव्हते. पण त्या पार्ट्यांमध्ये स्मोकिंग पेपर कायम मागवले जायचे. आता ते का मागवले जायचे हे माहित नाही,’ असे मॅनेजरने सांगितले.

यानंतर रियाचे एप्रिलमध्ये फार्महाऊसवर येणं-जाणं वाढले. ३१ एप्रिल रोजी या फार्महाऊसमध्ये एक बर्थ डे पार्टी करण्यात आली होती. त्यात रियाचे आई-वडीलदेखील सहभागी होते,’ असे मॅनेजर रईसने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

मोठी बातमी! मुंबईत पुन्हा संचारबंदी लागू; कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय

मुंबईत पुन्हा कलम १४४ कलम लागू, आज मध्यरात्रीपासून लागू होणार नवीन नियम

बहिणीच्या अफेअरबाबत कळताच सुशांतची काय रिॲक्शन होती पहा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.