सुशांतच्या दाजीने लॉंच केला ‘नेपोमीटर’; घराणेशाहीशी लढण्यास करणार ‘अशी’ मदत

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. यामुळे सर्व बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित झाला.

आता सुशांतचे दाजी विशाल कार्तिने नेपोमिटर नावाने एक साईट लॉंच केली आहे. यामध्ये घराणेशाहीशी संबंधित किती कलाकार चित्रपटामध्ये आहेत या आधारावर चित्रपपटांना रेटिंग दिले जाईल.

विशाल कार्तिने याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. नेपोमीटरबाबत सोशल मीडियावर सांगण्यात आले आहे की बॉलिवूड नेपोटिझमसोबत लढा. आम्ही चित्रपटाच्या सदस्यांनूसार रेटिंग करू.

चित्रपट किती नेपोटिस्टिक आणि किती स्वतंत्र आहे हे सांगू. दरम्यान सडक- 2 या आलिया भट्टच्या चित्रपटात नेपोमिटरने 98 टक्के नेपोटिझम असल्याचे म्हटले आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.