सुशांत प्रकरणात दोषी ठरवलं: रिया चक्रवर्तीने माध्यमांविरोधात दाखल केली याचिका

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत, मात्र या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिया विरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून, माध्यमांनी रियाकडे गुन्हेगाराच्या दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली आहे. असा आरोप रियाच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे माध्यमांविरोधात रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार माध्यमांकडून केले जाणारे आरोप थांबवण्यासाठी रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोर्टाचा निकाल लागण्यापूर्वीच माध्यमांनी रियाला दोषी ठरवले आहे.

तसेच, तिची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न थांबवण्यासाठी तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, सुशांत आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सुशांतचे आर्थिक व्यवहार आणि आरोग्य अशा सर्व मुद्यांवरून तपास सुरू आहे.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या ५६ लोकांमध्ये रियाचा देखील सामवेश आहे. दरम्यान, रियाला पोलीस ठाण्यात अनेकदा बोलावण्यात आले होते. रियाचा जबाब दोन वेळा नोंदवण्यात आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.