ऍम्ब्युलन्स अटेंडेंटच्या धक्कादायक खुलाशांनी खळबळ; सुशांतच्या शरीरावर जखमांसहीत..

मुंबई | बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतने आत्महत्या केल्यानंतर अनेक खुलासे होत आहेत. एकीकडे पैशाच्या व्यवहारासंबंधी ईडी चौकशी करत आहे. तर दुसरीकडे सीबीआय या प्रकरणात नवीन काही पुरावे मिळत आहेत का याकडे लक्ष देत आहे.

याचदरम्यान सुशांतची डेडबॉडी ऍम्ब्युलन्समध्ये घेऊन जाणाऱ्या अटेंडेंटने एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं आहे की, जेव्हा तो सुशांतच्या बेडरूममध्ये पोहोचला तेव्हा सुशांतची डेडबॉडी बेडवर पडलेली होती.

त्याच्या म्हणण्यानुसार त्याचे शरीर पिवळे पडले होते. त्याने याआधीही अनेक आत्महत्या करणाऱ्या लोकांचे शरीर बघितले आहेत पण ते पिवळे पडलेले नव्हते. याचबरोबर त्याने सांगितले की, सुशांतचे पाय वाकडे झाले होते.

त्याच्या पायावर जखमांच्या खुणा उमटलेल्या होत्या. त्याचबरोबर त्याच्या तोंडातून फेसही येत नव्हता. अटेंडेंटने सुशांतच्या गळ्यावर जे निशाण उमटले होते त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने पुढे काहीही सांगण्यास नकार दिला कारण त्याच्यावर पोलिसांचा दबाव आहे असे तो म्हणाला आहे.

दरम्यान, या प्रकरणात रिया चक्रवर्तीवर बरेच आरोप लावण्यात आले आहेत. मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती या दोघांची ईडीने सोमवारी १० तास चौकशी केली. त्यात रियाला काही प्रश्नांची उत्तरे देता आलेली नाहीत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.